श्रीरामपूर: नगरपरिषदेसमोर बुधवारी रात्री घडलेल्या प्राणघातक हल्ल्याने श्रीरामपूर शहर हादरले आहे. १८ वर्षीय नीरज धर्मेंद्र गुप्ता व त्याचे दोन मित्र धारदार शस्त्राच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. ‘या रस्त्यावर पुन्हा आलात, तर जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी देत आरोपी साहिल पिंजारी व त्याचा अल्पवयीन भाऊ पसार झाले.
Success Story:'विशाल केंजळेंची एमपीएससीमधून यशाला गवसणी'; जिद्दीच्या जाेरावर ११ वेळा सरळसेवा परीक्षेत सुयश, आई-वडिलांचे स्वप्न केलं पूर्णजखमी नीरज (रा. काँग्रेस भवनसमोर) याच्यावर सध्या साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्यासोबत असलेले दोघा अल्पवयीन मुलांच्या पोटावर वार झाल्याने त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
ही घटना धक्कादायक ठरण्याचे आणखी एक कारण म्हणजे आरोपी व जखमी दोघांच्याही गटात अल्पवयीन मुलांचा सहभाग होता. किरकोळ कारणावरून रात्रीच्या वेळी धारदार शस्त्रे घेऊन रस्त्यावर उभे राहणे, जीवघेण्या धमक्या देणे, या सर्व प्रकारांनी शहरातील पालकवर्ग व नागरिक चिंतेत आहेत. याप्रकरणी शहर पोलिसांत नीरज गुप्ताने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Smart Meter: मीटरचा हिशोब ‘स्मार्ट’ की फसवा?; वाढीव वीजबिलांमुळे ग्राहक संतप्त, दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात रांगामहिनाभरात शिवाजी रोड परिसरात गँगवॉरसदृश दोन घटना घडल्या आहेत. त्यातही अल्पवयीन मुलांचे नाव गुन्हेगारीत येत असल्याने ही गंभीर बाब मानली जात आहे. समाजातील तरुणाई चुकीच्या वाटेला जाऊ नये, यासाठी जनतेला आता पुढे यावे लागणार आहे.