92390
परुळेबाजार तंटामुक्ती
समिती अध्यक्षपदी परब
म्हापण ः परुळेबाजार ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी विजय परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही ग्रामसभा नुकतीच सरपंच प्रणिती आंबडपालकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसरपंच संजय दुधवडकर, सदस्य प्रदीप प्रभू, प्राजक्ता पाटकर, सीमा सावंत, तन्वी दुधवडकर, नमिता परुळेकर, अभय परुळेकर, सुनाद राऊळ, ग्राम महसूल अधिकारी आर. एस. नायकोडे, पोलिसपाटील जान्हवी खडपकर, ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे, पुरुषोत्तम प्रभू आदींसह आजी-माजी सरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे तंटामुक्त समितीचे पुनर्रचना करण्यात आली. यावेळी परब यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.