पराठा तयार करायचा म्हटलं की कणीक मळावी लागते, सारण भरून लाटावं लागतं आणि मग भाजावं लागतं. ही प्रक्रिया वेळखाऊ वाटते. पण आता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी लिक्विड अलू पराठा बनवू शकता. यात कणीक मळण्याची गरज नाही आणि पराठे पटकन तयार होतात.
साहित्य :उकडलेले व मॅश केलेले बटाटे
आलं–हिरवी मिरची (बारीक केलेली)
मसाले (तिखट, हळद, धणेपूड, गरम मसाला इ.)
कोथिंबीर (बारीक चिरलेली)
कांदा (ऐच्छिक)
गव्हाचे पीठ
मीठ, पाणी
तेल/तूप
सर्वप्रथम उकडलेल्या बटाट्यात आलं-हिरवी मिरची आणि मसाले घालून चांगले मिसळा.
त्यात कोथिंबीर आणि इच्छेनुसार कांदा घाला.
आता या मिश्रणात गव्हाचे पीठ घाला आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट बॅटर तयार करा.
हे बॅटर साधारण १० मिनिटे झाकून ठेवा.
गरम तव्यावर थोडं तेल/तूप सोडून हे जाड बॅटर चमच्याने पसरवा.
दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि खमंग होईपर्यंत भाजा.
View this post on InstagramA post shared by Citizen Foods (@citizenfoods1)