Pune News: हिंजवडीतील ट्रॅफिकचा प्रश्न सुटणार... लवकरच धावणार हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो, 'ही' असतील स्थानके
esakal September 21, 2025 02:45 AM

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या भागात प्रवाशांना सर्वाधिक ट्रॅफिकचा सामना करावा लागतो, त्या हिंजवडीत आता लवकरच मेट्रो धावणार आहे. हिंजवडी आयटी हब म्हणून ओळखले जाते, त्यामुळे अनेक लोक रोजगारासाठी येथे जातात. त्यांच्यासाठी देखील हा मोठा दिलासा आहे. वाकड आणि हिंजवडीतील नागरिकांचा पुणे प्रवास आता सोपा आणि आरामदायी होणार आहे.

मेट्रोमध्ये सर्व लोको पायलट महिला असणार आहेत. व्यवस्थापनाची जबाबदारी फ्रेंच कंपनीकडे देण्यात आली आहे. या मेट्रो मार्गावर ट्रायल रन आधीच पूर्ण झाले असून, मार्च 2025 पर्यंत सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे हिंजवडीचा ट्रॅफिकचा प्रश्न सुटणार आहे. हिंजवडीत मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असते, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

प्रकल्पाचे ८७ टक्के काम पूर्ण

केओलिस या फ्रेंच कंपनीने पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडसोबत करार केला आहे. त्यामुळे २३ स्थानकांवरील तिकीट व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्यावर असेल. २२ अल्स्टॉम गाड्यांची देखभाल देखील ही कंपनी करणार आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. २३ किमी लांबीचा हा मेट्रो मार्ग असून, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी मॉडेल)वर हा प्रकल्प विकसित केला आहे.

काम अंतिम टप्प्यात

सध्या जड बांधकामाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे हे उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर पुणेकरांना २०२६ पासून शिवाजीनगर ते हिंजवडी असा प्रवास मेट्रोने करता येणार आहे. या प्रकल्पासाठी ८ हजार ३१३ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर पुण्यातून हिंजवडी आयटी पार्कमध्ये येणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. अवघ्या ३५ ते ४० मिनिटांत या मार्गावर प्रवास करता येणार आहे.

कोणती स्थानके असणार?

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो स्थानके (एकूण २३):

मेगापोलिस सर्कल

एम्बेसी क्वाड्रॉन बिझनेस पार्क

डोहलर

इन्फोसिस फेज २

विप्रो फेज २

पाल इंडिया

शिवाजी चौक

हिंजवडी

वाकड चौक

बालेवाडी स्टेडियम

एनआयसीएमएआर (NICMAR)

रामनगर

लक्ष्मीनगर

बालेवाडी फाटा

बाणेर गाव

बाणेर

कृषी अनुसंधान केंद्र

सकाळनगर

विद्यापीठ

आरबीआय

कृषी महाविद्यालय

शिवाजीनगर

दिवाणी न्यायालय

Pune Police Recruitment : पुणे पोलिसांच्या हातांना बळ; १७०० पदे भरणार; उच्चाधिकार समितीकडून लवकरच शिक्कामोर्तब
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.