-rat१७p९.jpg-
२५N९२१३२
रत्नागिरी : रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करताना भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, मंदार खंडकर, संगीता कवितके, राजन पटवर्धन, अशोक वाडेकर, संकेत कदम, प्रतीक देसाई आदी.
-----
रक्तदानाने सेवा सप्ताहाला प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण रत्नागिरी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ३२ जणांनी रक्तदान केले. भाजयुमो जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर यांच्या नेतृत्वात हे शिबिर झाले. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
मत्स्य, बंदरविकास मंत्री आणि भाजपाचे संपर्कमंत्री नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित केल्याचे मंदार खंडकर यांनी सांगितले. भाजयुमोचे सितेश पर्शराम, अथर्व करमरकर, ओमकार भाताडे, सिद्धेश वाडेकर, सिद्धाय मयेकर, पार्थ पंडित, तकदीर जागीरदार, प्रथमेश सुर्वे, प्रथमेश सागवेकर, रोहन वाडेकर, दुर्गेश पिलणकर, अभिजित पटवर्धन, अनिश केतकर, विदेश गाडगीळ, संदेश माचिवले, सागर बोरकर, रोहन वाडकर, अक्षय पाचकुडे, किशोर गिरी, संकेत कदम, पूनम भिडे यांनी शिबिराच्या आयोजनात सहभाग घेतला.