आनंद दिघे नेते, उपनेते नव्हते, ते जिल्हाप्रमुख होते, बाळासाहेबांच्या बाजूला त्यांचा फोटो का? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना थेट धमकी दिली होती. 'संजय राऊत यांना घरात घुसून मारू,' असं ते म्हणाले होते.
आमदार राजेश मोरे यांच्या या धमकीनंतर आता मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर आता राजकीय प्रतिक्रियी उमटू लागल्या आहेत. खासदार संजय राऊत यांनीही या धमकीला प्रत्युत्तर दिलं आहे. महत्त्वाचे म्हणजे या धमकीनंतर संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती आहे.
यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, ''मी जिथेही जातो तिथे एकटा जातो. माझ्याकडे कोणताही पोलीस बंदोबस्त नाही. मी शिवसेनेचा नेता आहे. मला माहिती आहे, की जय महाराष्ट्राची ताकद काय आहे'' पुढे बोलताना, हिंमत असले तर येऊन दाखवा, नंतर तुम्ही परत कसे जाता तेच बघतो, असं प्रत्युत्तरही संजय राऊत यांनी दिलं.
Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरेदरम्यान, संजय राऊत यांनी काल धर्मवीर आनंद दिघे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. संजय राऊतांविरोधात शिवसेना शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी 'जोडे मारो' आंदोलनही केले होतं. डोंबिवलीतील शिंदे गटाच्या आंदोलनात आमदार मोरे सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी संजय राऊतांना थेट धमकी दिली होती.
Sanjay Raut: संजय राऊतांना घरात घुसून मारू, शिंदेसेनेच्या आमदारांची थेट धमकी; राजकारणात वाद पेटणारआनंद दिघे यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर संजय राऊत यांना त्यांच्या घरात घुसून मारल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत. पुढे संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत मोरे यांनी राऊतांना राहुल गांधी आणि शरद पवार यांच्याकडून सुपारी घेतल्याचा आरोप केला होता.