'इंडियन आयडॉल'मधून आपल्या गायनाच्या प्रवासाला सुरुवात करणारा गायक अभिजीत सावंत आता एका नव्या रूपात प्रेक्षकांसमोर आला आहे. गेली २० वर्षे गायन क्षेत्रात विविध प्रयोग करणाऱ्या अभिजीतने यंदाच्या नवरात्रीसाठी एक खास भेट दिली आहे. त्याने गायलेलं पहिलं-वाहिलं गुजराती गाणं ‘प्रेमरंग सनेडो’ नुकतंच प्रदर्शित झालं आहे.
नवरात्रीचा उत्साह सुरू असतानाच हे गाणं आल्यामुळे त्यात अजूनच भर पडली आहे. आतापर्यंत अनेक गाण्यांनी रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिजीतच्या आवाजाची जादू आता गुजराती प्रेक्षकांनाही अनुभवायला मिळणार आहे. या गाण्याबद्दल बोलताना अभिजीत म्हणाला की, "एखादं छान गुजराती गाणं करण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. ‘प्रेमरंग सनेडो’ हे गरब्याचं गाणं करताना मला खूप मजा आली. गुजराती गाण्याला मराठीचा तडका देऊन हे गाणं तयार करण्यात आलं आहे. दोन वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृती एकत्र आणण्याचा अनुभव खूप खास होता."
View this post on InstagramA post shared by (@statuspoint_21_)
अभिजीतने आजवर अनेक लोकप्रिय गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. आता तो आपल्या या नव्या गाण्याने गुजराती प्रेक्षकांनाही मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे.
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला- मधल्या काळात मी सगळं सोडून...