अहिल्यानगर : महाराजस्व अभियानात (Maharajaswa Abhiyan) तिसऱ्या टप्प्यातील सेवा पंधरवड्यात पुरवठा विभागात पारदर्शकता आणली जाणार आहे. यामध्ये शिधापत्रिकेतील नाव वाढविणे, कमी करणे ही कामे घरबसल्या करता येणार आहेत, तसेच स्वस्त धान्य दुकानात हक्काचे धान्य मिळते का, रेशन दुकानदाराकडून सन्मानाची वागणूक मिळते का, ग्राहकाला आलेला अनुभव क्यूआर कोडच्या माध्यमातून शासनापर्यंत कळणार आहे. त्यासाठी सर्व रेशन (Ration Card Updates Online) दुकानात चार प्रकारचे क्यूआर कोड (QR Code) लावले जाणार आहेत.
जिल्ह्यात महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून विविध मोहिमा राबविल्या जात आहेत. यामध्ये जिल्हा पुरवठा विभागात पारदर्शकता आणण्यासोबत ग्राहकाभिमुख कारभार होण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे व प्रत्येक तालुक्यातील पुरवठा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेशन दुकानदार व ग्राहकांत सकारात्मकता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
यासाठी वापरा क्यूआर कोडपहिला : शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली
यामध्ये नवीन शिधापत्रिका काढणे, शिधापत्रिकेतील नाव वाढविणे व कमी करणे बाबींसाठी घरबसल्या अर्ज करण्याची सोय
दुसरा : रेशन दुकानातील धान्य वितरण माहिती
हा कोड स्कॅन करून हक्काचे धान्य मिळतेय का? वितरणाची तारीख, प्रमाण, पात्रता तपासणे शक्य. दुकानातून वितरित झालेली सर्व माहिती देणे.
Kaas Pathar Satara : चक्क नो पार्किंगमध्येच 'पोलिस टोपी'चा रुबाब; कायद्याचे रक्षकच ठरले नियमभंग करणारे, कास पठारावरील प्रकारतिसरा : रेशन दुकानाला रेटिंग देण्याची प्रणाली
दुकानात कशी वागणूक मिळाली, काटामारी, बोलण्यात सकारात्मकता, पैसे जादा घेतले का? आदी बाबींबाबत माहिती देणे. केलेल्या तक्रारीतून वरिष्ठांकडून झालेल्या कार्यवाहीची माहिती.
चौथा : कार्यालय सेवा अभिप्राय फॉर्म
यामध्ये रेशन दुकानातील सेवेविषयी अभिप्राय नोंदवता येणे शक्य. जेणेकरून आगामी काळात या व्यवस्थेत काही बदल करता येणार आहेत. शासनाला नेमकी माहिती समजणार आहे.
जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने सेवा पंधरवड्यात शिधापत्रिकांच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. कुटुंबातील सदस्य विभक्त झाल्यास त्यांच्या स्वतंत्र शिधापत्रिकांची प्रकरणे मार्गी लावणे, विवाह किंवा स्थलांतर आदी कारणांमुळे शिधापत्रिकांमधून नाव वगळणे, नव्याने समावेश करणे ही कामे प्राधान्याने केली जात आहेत.
- हेमा बडे, जिल्हा पुरवठा अधिकारी