Political Astrology : एकनाथ शिंदेंना २०३०पर्यंत राहूची महादशा, कसा राहणार त्यांच्या पक्षाचा प्रभाव? जाणून घ्या राजकीय भविष्य...
esakal September 22, 2025 05:45 AM

मकर राशीत रवी असल्यामुळे खडतर सुनावणीनंतर एकनाथ शिंदेना सामान्य स्थितीमधून अधिकार प्राप्त झाला आहे. या रवीमुळे तळागाळातील लोकांपर्यंत दांडगा जनसंपर्क लाभला आहे. रवी-मंगळासारखा अधिकार योग निर्माण झाला आहे. या योगामुळे पक्षप्रमुख म्हणून सहकारी आमदार-खासदारांनी त्यांचे नेतृत्व स्वीकारले असून या योगामुळे केंद्रातील भाजपच्या वरिष्ठांशी चांगले संबंध व समर्थन मिळाले आहे. २०१२ ते २०३० हा काळ त्यांच्या राजकीय यशासाठी महत्त्वपूर्ण असून, या काळात त्यांचा राजकारणातील प्रभाव कायम राहू शकतो, असं भाकीत ज्योतिष्याश्चार्य सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तवलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या पत्रिकेत रवी-मंगळ युती व उच्च राशीतील मंगळ, शुक्र; तसेच स्वराशीतील गुरू-शनी या बलवान ग्रहयोगामुळे सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री अशी आश्चर्यकारक वाटचाल अनुभवास आली आहे. धनू राशीत चंद्र-केतू असून, मूळ नक्षत्र असल्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बंड करण्यात यश आले आहे. मात्र, दशमातील नेपच्युनमुळे अनेक आरोपांना तोंड द्यावे लागले आहे, असंही ते म्हणाले.

Political Astrology : अजित पवारांच्या मागची साडेसाती कधी संपणार? या महिन्यात होणार मोठा राजकीय बदल, जाणून घ्या भविष्य....

सध्या धनू राशीच्या चतुर्थ स्थानातून शनीचे भ्रमण सुरू असल्यामुळे त्यांच्या नाराजीविषयी चर्चा सुरू आहे. मात्र, १८ ऑक्टोबर ते पाच डिसेंबर कर्क राशीतील गुरूचे भ्रमण त्यांच्यासाठी लाभदायक राहू शकते. विशेषत: जून २०२६नंतरचा काळ त्यांच्यासाठी सन्मानजनक राहू शकतो, असंही त्यांनी नमूद केलं.

Political Astrology : फडणवीसांसाठी कटकटीचा काळ ते राज्याच्या राजकारणात मोठ्या फेरबदलाची शक्यता...जाणून घ्या या आठवड्याचं राजकीय भविष्य!

पत्रिकेत शनी-मंगळ बलवान असल्यामुळे पक्ष-चिन्हाच्या कायदेशीर लढाईत त्यांना दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे. २०३०पर्यंत राहू महादशा सुरू असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असून, पक्षाचे सत्तेतील स्थान कायम राहील, असंही त्यांनी सांगितलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.