पारगाव, ता. २१ : जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथे बिरोबा नवरात्रोत्सवानिमित्त सोमवार (ता. २२) ते बुधवार (ता. १) दररोज सायंकाळी ६.४५ ते ८.४५ पर्यंत हरिकीर्तन, रात्री ८.४५ वाजता महाआरती त्यानंतर महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती जारकरवाडी सोसायटीचे सचिव नवनाथ मंचरे यांनी दिली.
नवरात्रोत्सवाच्या दहाही दिवशी दररोज सकाळी ७.३० वाजता श्रींची आरती, पूजा, सकाळी ८ वाजता आणि सायंकाळी ५ वाजता विठ्ठल बिरदेव ग्रंथाचे पारायण, सायंकाळी ६.४५ तरात्री ८.४५ पर्यंत हरिकीर्तन रात्री ८.४५ वाजता महाआरती होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद, वाण व ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे. रात्री १० ते १२ नामजागर, गुरुवारी (ता. २) सायंकाळी ६ वाजता १२ बैलगाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ८ वाजता होममिनिस्टर कार्यक्रम होणार आहे.
कीर्तन महोत्सवात गुरुदास महाराज जगताप, अश्विनी टाव्हरे, अनिकेत बांगर, बाळशिराम मिंडे, काजल पोतले, ज्ञानेश्वर दौंडकर, ज्ञानेश्वर वाबळे, संजीवनी गडाख, विशाल खोले, प्रतीक्षा जाधव यांची कीर्तन सेवा होणार आहे.