बिगर आदिवासी विद्यार्थिनींना मदतीचा हात
वाणगाव ता.२० (बातमीदार) : आदिवासी व बिगर आदिवासी समाजातील तळागाळातील गरजू, गरीब व होतकरू महिला व विद्यार्थिनींना फॅशन डिझाईन मधील पदवीचे शिक्षण हे विनामूल्य दिले जाते. शिक्षण मोफत जरी असले तरी शैक्षणिक साहित्य खरेदी करणे ही खर्चिक बाब असून विद्यार्थिनींच्या पालकांना न परवडणारा खर्च आहे, या दृष्टिकोनातून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी तब्बल १२ लाख रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य विद्यार्थिनींना विनामूल्य वाटप करण्यात आले.ग्रामीण भागात आदिवासी व बिगर आदिवासी महिला आणि विद्यार्थिनींच्या हितासाठी अखंड विनामूल्य सेवा देत वि.म. पाटील कृषी प्रतिष्ठान, आसनगाव यांच्या स्वाती पाटील बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या आदिवासी व गरीब बिगर आदिवासी समाजाच्या विद्यार्थिनींना तब्बल १२ लाखाचे शैक्षणिक साहित्य विनामूल्य वाटप करण्यात आले. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी मिलिंद पाटील यांनी दिली आहे.