उद्यापासून देशात नवे जीएसटी दर, काय म्हणाले पंतप्रधान? मोदींच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे
Tv9 Marathi September 22, 2025 09:45 AM

आज मध्यरात्रीपासून देशभरात जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत, केंद्र सरकारनं जीएसटी संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. पुर्वी जीएसटीचे चार स्लॅब होते, त्यातील दोन रद्द करून आता फक्त 18 टक्के आणि 5  टक्के असे दोनच स्लॅब ठेवण्यात आले आहेत. सुधारीत दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील, त्यामुळे अनेक वस्तू आता स्वस्त होणार आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहे. अमेरिकेनं भारतावर लावलेला टॅरिफ आणि त्यानंतर एच 1बी व्हिसावर वाढवलेले शुल्क या पार्श्वभूमीवर मोदी यांनी दिलेला आत्मनिर्भर भारताचा नारा महत्त्वाचा आहे, त्यांनी यावेळी बोलताना जनतेला स्वदेशी वस्तूच खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे, जी वस्तू तयार करण्यासाठी देशातील लोकांची मेहनत लागली आहे, अशाच वस्तू खरेदी करा असं त्यांनी म्हटलं आहे, तसेच ज्या वस्तू देशात तयार करता येतात, त्या देशातच तयार व्हाव्यात
लघु, सूक्ष्म, कुटीर उद्योगांकडून मोठी अपेक्षा आहे, आपण जे तयार करु, त्याची क्लालिटी जगात गौरव वाढवणारी असावी, असंही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे  

आता फक्त 5 टक्के आणि 18 टक्क्यांचा जीएसटी स्लॅब
अनेक जीवनावश्यक वस्तू होणार स्वस्त
ज्या वस्तूंवर आधी 12 टक्के टॅक्स होता, त्यावर आता 5 टक्के टॅक्स
जीएसटी कमी झाल्यामुळे घर, टीव्ही, फ्रीज, कार, बाईक, स्वस्त होणार
हॉटेल्स प्रवासावर जीएसटी कमी केला
नागरिक देवो भव: हा मंत्र घेऊन आम्ही पुढे जात आहोत
इन्कम टॅक्समध्ये सूट आणि जीएसटी रिफॉर्ममुळे अडीच लाखांची बचत
ज्या वस्तू देशात तयार करता येतात, त्या देशातच तयार व्हाव्यात
लघु, सूक्ष्म, कुटीर उद्योगांकडून मोठी अपेक्षा आहे
आपण जे तयार करु, त्याची क्लालिटी जगात गौरव वाढवणारी असावी, असं यावेळी मोदी यांनी म्हटलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.