92981
‘कोमसाप’च्या अध्यक्षपदी नमिता किर
केंद्रीय कार्यकारिणी जाहीर; कार्याध्यक्षपदी डॉ. प्रदीप ढवळ
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ ः कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सभेत नवीन विश्वस्त व केंद्रीय कार्यकारिणी २०२५ ते २०२८ ची निवड जाहीर करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या सूचनेनुसार अध्यक्षपदी नमिता किर तर कार्याध्यक्षपदी डॉ. प्रदीप ढवळ यांची फेरनिवड करण्यात आली.
विश्वस्त मंडळ असे ः विश्वस्त-मंत्री डॉ. उदय सामंत, आमदार संजय केळकर, अनुप कर्णिक, प्रा. एल. बी. पाटील, रेखा नार्वेकर, केंद्रीय कार्यकारिणी अध्यक्ष नमिता कीर (रत्नागिरी), कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ (ठाणे), कार्यवाह माधव अंकलगे (मालगुंड), प्रा. दीपा ठाणेकर (ठाणे), प्रकाश दळवी (रत्नागिरी), केंद्रीय कार्यकारिणी सदस्य-मंगेश मस्के, रुजारिओ पिंटो, आनंद शेलार, बाळासाहेब लबडे, संजय गुंजाळ, गणेश कोळी, मोहन भोईर, रुपचंद भगत, विद्या प्रभू, जगदीश भोवड, तुकाराम कांदळकर, योगेश जोशी, प्रवीण दवणे, सुहास राऊत. विविध समित्यांचे प्रमुख ः झपुर्झा प्रकाशन समिती-नमिता कीर, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन व पुस्तकांचे गाव समिती-गजानन पाटील, महिला साहित्य संमेलन समिती-उषा परब व वृंदा कांबळी, युवाशक्ती-दक्षिण कोकण (रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्हे) अरुण मोर्ये, उत्तर कोकण (मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई) नाट्य समिती-डॉ. अनिल बांदिवडेकर, किरण येलये, मंदार टिल्लू, अमेय धोपटकर. समन्वय समिती-रवींद्र आवटी, जयू भाटकर, अनंत वैद्य, अशोक बागवे, चंद्रमोहन देसाई. विधी व कायदा समिती-अॅड. स्वाती दीक्षित, लेखा परीक्षण समिती-मधुकर टिळेकर. कोमसाप भवन बांधकाम समिती-गजानन पाटील, माधव अंकलगे, प्रकाश दळवी, संदीप वालावलकर. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. या चर्चेमध्ये दिवाकर दळवी, अॅड. नकुल पार्सेकर, प्रा. सुभाष गोवेकर, जयू भाटकर, राजू तावडे, सुरेश ठाकूर यांनी आपली मते मांडली. याप्रसंगी संस्थेच्या ३२ व्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन केले. जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी स्वागत केले.