92989
कासार्डे येथे आजपासून
नवरात्रोत्सवाचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २१ : कासार्डे येथील श्री सिद्धिविनायक नवरात्र उत्सव मंडळातर्फे उद्यापासून (ता. २२) विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उद्या सकाळी १० वाजता सुभाष पाताडे यांच्या हस्ते श्री दुर्गा मूर्तीची प्रतिष्ठापना, सायंकाळी ७ वाजता श्री गांगेश्वर भजन मंडळ तळेरे यांचे भजन होईल.
२३ ला श्री स्वयंभू प्रासादिक भजन मंडळ कासार्डे, २४ ला सायंकाळी ७ वाजता श्री गांगेश्वर भजन मंडळ कासार्डे धुमाळवाडी, रात्री ८ वाजता श्री इसवटेश्वर विश्वकर्मा भजन मंडळ कासार्डे दाबवाडी यांची भजने होतील. तसेच २५ ला सकाळी ८ वाजता रक्तदान शिबिर, रात्री ८ वाजता श्री गांगेश्वर भजन मंडळ तरळे, २६ ला सायंकाळी ७ वाजता आवळेश्वर भजन मंडळ कासार्डे तांबळवाडी, रात्री ८ वाजता श्री दत्तगुरू भजन मंडळ कासार्डे भोगले-पारकरवाडी, २७ ला दुपारी ३ वाजता श्री खापरादेवी फुगडी मंडळ, ओझरम मापारवाडी यांचा कार्यक्रम, सायंकाळी ४ वाजता ‘होम मिनिस्टर’, सायंकाळी ७ वाजता श्री हनुमान भजन मंडळ तळेरे वाघाचीवाडी, रात्री ९ वाजता सांघिक वेशभूषा स्पर्धा, २८ ला दुपारी ३ वाजता फनिगेम्स, सायंकाळी ७ वाजता श्री साईनाथ भजन मंडळ, ओझरम, रात्री ९ वाजता वैयक्तिक वेशभूषा स्पर्धा, २९ ला श्री स्वयंभू भजन मंडळ कासार्डे उत्तर, ३० ला सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता भंडारा महाप्रसाद, ३ वाजता हळदी-कुंकू, सखी फुगडी ग्रुप पावशी कुडाळ यांची फुगडी, सायंकाळी ५ वाजता श्री दत्तात्रय भजन मंडळ कासार्डे भोगले-पारकरवाडी, ६ वाजता श्री स्वयंभू भजन मंडळ, रात्री ९ वाजता (कै.) आना मेस्त्री ग्रुप नेरुर प्रस्तुत नेरुर मांड उत्सवातील रोंबाट कार्यक्रम, १ ऑक्टोबरला श्री महापुरुष भजन मंडळ कासार्डे देऊलकरवाडी, २ ला अष्टविनायक भजन मंडळ बावशी, रात्री ९ वाजता ग्रुप डान्स स्पर्धा, बक्षीस वितरण, सत्कार समारंभ, ३ ला विसर्जन मिरवणूक होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन श्री सिद्धिविनायक नवरात्रोत्सव मंडळ अध्यक्ष सहदेव उर्फ अण्णा खाडये, सचिव सचिन राणे, खजिनदार राहुल उर्फ राजू शेटये यांनी केले आहे.