इतरांच्या कौतुक-टीकेला क्षणिक ढगाप्रमाणे पहा आणि मन विचलित होऊ देऊ नका, स्वतःच्या कर्तव्यावरच लक्ष केंद्रित करा.
समाजाच्या दबावात 'चारचौघे काय म्हणतील' यापेक्षा 'मी काय अपेक्षित आहे ते करावे' हे प्राधान्य द्या, जेणेकरून स्वतंत्र ओळख टिकेल.
भगवद्गीतेच्या मार्गदर्शनाने सत्याशी प्रामाणिक राहा, यामुळे मानसिक शांती मिळेल आणि अनावश्यक दडपण टाळता येईल.
समाज म्हणजे एक बहुरंगी आणि बहुविध मतमतांतरांचा एक कोलाहल असतो. आपल्या जवळच्या कुटुंबापासून ऑफिसमधील सहकारी, शेजारी, मित्रपरिवार आणि सोशल मीडियाच्या या मांदियाळीत सल्ले, मते आणि टीकेची कमतरता कधीच जाणवत नाही. अर्थात प्रत्येक सल्ला किंवा मत आपल्यासाठी हानिकारक असतं, असं अजिबात नाही. काही प्रमाणात इतरांची मते जाणून घेणे आणि त्यानुसार काहीसे बदल करणेही हितकारक ठरू शकते.
पण बहुतांश वेळा असं होत नाही. इतरांच्या मतांचं आणि त्यांच्या सल्ल्यांचं किंवा टीकेचं आपल्यावर प्रचंड दडपण असतं. यातून बाकी काही घडो अथवा नाही, आपली स्वतंत्र ओळख आणि समाधान मात्र हरवत जातं. सतत दुसऱ्यांच्या मतांवर विसंबून राहणं आणि त्यांचे सल्ले-टीकेला अनावश्यक महत्त्व देणं हे कधीच न संपणारं चक्र निर्माण होतं. यातून निर्माण होते प्रचंड मानसिक दडपण.
भगवद् गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला असंख्य मौलिक सल्ले दिले. 'इतरांच्या मान्यतेवर अवलंबून राहिला तर मन:शांती मिळू शकणार नाही' हा सल्ला आपल्यासाठीही तितकाच महत्त्वाचा आहे.
चारचौघं काय म्हणतील?भगवद् गीतेमध्ये अर्जुन काहीसा द्विधा मनस्थितीत आहे. मनाचं ऐकायचं की समाज काय म्हणतोय याचा विचार करायचा, यात दोलायमान स्थिती निर्माण होते. स्वत:च्याच नातेवाईकांविरोधात लढलं तर समाज काय म्हणेल, या विचारानं अर्जुन वेढला गेला आहे.
पण भगवान श्रीकृष्णांनी यावर अचूक मार्गदर्शन केलं. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जबाबदारीचे पालन करणे ही आहे, त्याबद्दल इतर लोक काय बोलतात किंवा त्यांचे समाधान करणे ही नाही. धर्म म्हणजे आपल्याकडून इतरांच्या काय अपेक्षा आहेत, हे नव्हे तर आपण आपल्या सत्याशी प्रामाणिक राहणे, असे श्रीकृष्ण म्हणतात.
बँकेत जमा केले ५०० रुपये अन् काढले ५ कोटी..२३ वर्षीय मुलगा बनला कोट्यधीश, पण शेजाऱ्यांनी त्याचा बाजार उठवला, नेमकं प्रकरण काय? कौतुक आणि टीकेनं विचलित होऊ नकातुमच्यावर जोरदार टीकाही होईल आणि प्रचंड कौतुकही होईल. या दोन्ही परिस्थितींमध्ये मन विचलित न होऊ देणे महत्त्वाचे आहे. कारण या दोन्ही स्थिती कायम राहणार नाहीत आणि एखादे कौतुक किंवा एखादी टीका यावरून तुमचे जीवन किंवा चरित्र ठरवले जाऊ शकत नाही.
लोकांकडून होणाऱ्या कौतुकाची सवय लागली की इतरांच्या मतांना प्राधान्य देत त्यांच्या मान्यतेसाठी आपण सतत प्रयत्न करू लागतो. याचप्रमाणे, इतरांच्या टीकेलाही वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देऊ लागलो, तर मनात भीती बसेल.
याचमुळे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कौतुक आणि टीका दोन्हीकडे एखाद्या अल्पजीवी ढगाप्रमाणे पाहा. जसा ढग एकाच जागी स्थिरावलेला नसतो, सतत जागा बदलत असतो त्याच प्रमाणे कौतुक आणि टीकाही सतत बदलत असतात.
Retro Photo Prompt For Men : मुलींनी खूप AI फोटो बनवले! आता मुलांची बारी..Retro स्टाइल फोटो बनवा एका क्लिकवर...'हे' घ्या 10 प्रॉम्प्टम्हणूनच पुढच्या वेळी कौतुक होईल तेव्हा त्याला चिकटून बसू नका. सुहास्य वदनाने त्याचा स्वीकार करा आणि नित्य कामांना सुरुवात करा.
तसेच पुढच्या वेळी टीका होईल तेव्हा प्रतिक्रिया देण्याची घाई करू नका. त्यातील आपल्या दृष्टीने तथ्य काय आहे तेवढं स्वीकारा आणि बाकीचं सोडून द्या.
थोडक्यात काय, आपल्या प्रत्येक कृतीविषयी बाकीच्यांची मते, सल्ले आणि त्याबद्दल त्यांचे 'व्हर्जन' कायम असणार आहेच. पण त्या दडपणासमोर झुकून आपले कर्तव्य पार पाडताना अडथळे निर्माण न होऊ देणे, हेच महत्त्वाचे आहे. 'मी असे केले तर चारचौघे काय विचार करतील' यापेक्षा 'मी काय करणे अपेक्षित आहे' याला प्राधान्य द्या.
FAQsWhat does Lord Krishna say about ignoring others' opinions?
भगवान श्रीकृष्ण म्हणतात की इतरांच्या मतांवर अवलंबून राहणे मन:शांती नष्ट करते. कर्तव्याचे पालन करणे हेच मुख्य आहे, समाजाच्या अपेक्षांपेक्षा स्वतःच्या सत्याशी प्रामाणिक राहा.
How to handle praise and criticism according to Bhagavad Gita?
कौतुक आणि टीका हे अल्पजीवी ढगांसारखे आहेत, जसे ढग येत-जात राहतात तसे हेही बदलत असतात. कौतुक स्वीकारा पण चिकटून न बसा, टीकेतून फक्त तथ्य घ्या आणि बाकी सोडा.
Why do we get affected by societal pressure?
समाजातील सल्ले, मते आणि टीका आपल्या स्वतंत्र ओळखीला धक्का देतात, ज्यामुळे मानसिक दडपण वाढते. श्रीकृष्ण सांगतात की 'चारचौघे काय म्हणतील' यापेक्षा 'मी काय अपेक्षित आहे ते करावे' याला प्राधान्य द्या.
What is the key to mental peace as per Gita?
गीतेच्या अनुसार, इतरांच्या मान्यतेसाठी प्रयत्न न करता स्वतःच्या जबाबदारीकडे लक्ष द्या. हे केल्याने मनाची शांती मिळते आणि विचलन टाळता येते.
How can I stay focused on my duties despite others' talks?
प्रत्येक टीका किंवा सल्ल्यात फक्त उपयुक्त भाग घ्या, बाकी दुर्लक्ष करा. श्रीकृष्णांच्या सल्ल्यानुसार, कर्तव्य हे धर्म आहे, इतरांच्या समाधान नाही.