Bank Jobs: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 'या' बँकेत 1 लाखापेक्षा जास्त पगार, पात्रता काय?
Tv9 Marathi September 22, 2025 12:45 PM

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यात मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक अशा महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. यासाठी इच्छुक उमेदवार 9 ऑक्टोबर 2025 पर्यंत बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकणार आहेत. या पदांसाठी पात्रता आणि पगार काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

मुख्य व्यवस्थापक

मुख्य व्यवस्थापक या पदासाठी 2 जागा उपलब्ध आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे अर्थशास्त्र/वाणिज्य किंवा वाणिज्य शाखेची पदवी असणे आवश्यक आहे. मात्र या जागांसाठी सीए, एमबीए किंवा आयआयएम प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. या उमेदवारांना बँकिंग/ब्रोकरेजमध्ये 8 वर्षांचा अनुभव आणि गुंतवणूकदार संबंध/कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स/संशोधनात 2 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी पगार 1,02,300 ते 1,20,940 रुपये आहे.

ट्रेड फायनान्स ऑपरेशन्स व्यवस्थापक

ट्रेड फायनान्स ऑपरेशन्समध्ये व्यवस्थापकाची 14 पदे आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 24 ते 34 वर्षांच्या दरम्यान असावे. यासाठी उमेदवार पदवीधर असले पाहिजेत, मात्र IIBF FOREX, CDCS किंवा CITF प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. तसेच उमेदवारांना ट्रेड फायनान्स ऑपरेशन्समध्ये किमान 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदांसाठी 64,820 ते 93,960 इतका पगार मिळेल.

फॉरेक्स अ‍ॅक्विझिशन अँड रिलेशनशिप मॅनेजर

फॉरेक्स अ‍ॅक्विझिशन अँड रिलेशनशिपमध्ये मॅनेजर पदासाठी 37 जागा आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 26 ते 36 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. यासाठी पदवी अनिवार्य आहे. मात्र MBA किंवा PGDM ला प्राधान्य दिले जाणार आहे. या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच ट्रेड फायनान्स आणि फॉरेक्स सेल्समध्येही 1 वर्षाचा गरजेचाआहे. या पदासाठी 64,820 ते 93,960 इतका पगार मिळेल.

वरिष्ठ व्यवस्थापक

वरिष्ठ व्यवस्थापकाची 5 पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 29 ते 39 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. यासाठी पदवी आणि पूर्णवेळ MBA/PGDM (सेल्स, एँड, फायनान्स किंवा बिजनेस) हे शिक्षण आवश्यक आहे. या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे, यात ट्रेड फायनान्स आणि फॉरेक्स सेल्समधील 3 वर्षांच्या अनुभवाचाही समावेश आहे. या पदासाठी पगार 85,920 ते 1,05,280 रुपये पगार मिळेल.

या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी बँकेच्या bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर करिअर विभागातील Current Opportunities लिंकवर क्लिक करा. त्यानंतर अर्ज करण्यास इच्छुक आहात ते पद निवडा. ऑनलाइन अर्ज करा वर क्लिक करा. ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर टाका, इतर आवश्यक माहिती भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि ऑनलाइन शुल्क भरा. अर्ज सबमिट झाल्यानंतर संदर्भासाठी पावती डाउनलोड करा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.