नुकताच राजस्थानच्या जयपूरमध्ये घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती तिसऱ्या मजल्यावरून खाली पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना असे वाटले की खाली पडल्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अक्षरश: अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. पण आता याबाबत माहिती समोर आली आहे. नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया…
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा 9 सप्टेंबरचा आहे. एक व्यक्ती तिसऱ्या मजल्यावर उभी असते. त्या व्यक्तीचा तोल जातो आणि तो खाली पडतो. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद धाली आहे. असे म्हटले जात आहे ती व्यक्ती एक व्यापारी आहे. त्याची ओळख नजीर अशी आहे. तसेच तो केवळ 25 वर्षांचा आहे. तिसऱ्या मजल्यावरून पडल्यानंतर फक्त त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.
वाचा: चौघुले जरा इकडे या… भर विमानात मुख्यमंत्री फडणवीसांनी आवाज दिला अन्…
Jodhpur, Rajasthan ‼️
A cloth merchant fell from the 3rd floor.
The entire incident was caught on CCTV. pic.twitter.com/MsXs8UqdlE— Deadly Kalesh (@Deadlykalesh)
नेमकं काय घडलं?
व्हायरल व्हिडीओमध्ये नजीर बाल्कनीत उभा दिसत आहे. तो कपड्यांचा गठ्ठा पाहत होता, तेवढ्यात अचानक त्याचा तोल गेला आणि तो रेलिंगवरून खाली पडला. तो खाली रस्त्यावर उभ्या असलेल्या स्कूटीवर पडला, त्यामुळेच त्याचा जीव वाचला. मीडिया अहवालानुसार, घटनेनंतर दोन लोक तातडीने त्याच्या मदतीसाठी धावले आणि नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. असा दावा केला जात आहे की, नजीरच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.
थोडक्यात वाचला व्यक्तीचा जीव
फक्त १० सेकंदांच्या सीसीटीव्ही क्लिपमध्ये नजीर हातात पाण्याची बाटली घेऊन बाल्कनीच्या काठावरुन पडताना दिसत आहे. त्याला वाटते की त्याच्या मागे भिंत आहे, पण त्याचा तोल जातो आणि तिसऱ्या मजल्यावरून खाली पडतो. त्यानंतर एक मोठा आवाज आला, जो कदाचित नजीरचा होता. घटनेनंतर त्याच मजल्यावरून आणखी एक व्यक्ती बाल्कनीकडे धावताना दिसत आहे. या घटनेमुळे जुन्या इमारतींमधील सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच, लोकांनी अशा दुर्घटना टाळण्यासाठी अधिक चांगली खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली.