मंडणगड ः उद्योग निर्मितीतून रोजगाराचे प्रयत्न
esakal September 23, 2025 02:45 AM

rat22p4.jpg-
93148
मंडणगड ः मैत्री फाउंडेशनच्या वतीने मंत्री योगेश कदम यांचा सत्कार करताना मनोज मर्चंडे. सोबत राजेश मर्चंडे व अन्य मान्यवर.

उद्योगनिर्मितीतून रोजगाराचे प्रयत्न
योगेश कदम ः मैत्री फाउंडेशनतर्फे करिअर मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता.२२ ः योग्य ध्येय, मेहनत व जिद्दीच्या जोरावर आपल्या क्षेत्रात यश संपादित करून जीवनात यशस्वी होता येते त्यासाठी नियोजनाचीही अत्यंत आवश्यकता असते. विद्यार्थ्यांनी आपले करिअरसंदर्भात या बाबींचे पालन करणे आवश्यक आहे. विकासाची संकल्पना वेगवेगळ्या असल्या, तरी आर्थिक विकास महत्त्वाचा असल्याने मंडणगड तालुक्यात एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योगनिर्मितीतून येथील युवकांच्या रोजगारासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.
मंडणगड येथील मैत्री फाउंडेशनतर्फे बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात आयोजित करिअर मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राजेश मर्चंडे, गटविकास अधिकारी सुनील खरात, पोलिस निरीक्षक नितीन गवारे, नगरसेवक आदेश मर्चंडे, मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज मर्चंडे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, अस्मिता केंद्रे, शिवसेना शहरप्रमुख विनोद जाधव उपस्थित होते.
या कार्यक्रमात दहावी, बारावी उत्तीर्ण व विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणाऱ्या गुणवंतांचा कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दहावी, बारावी व पदवीनंतरच्या करिअरच्या विविध क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शक कुणाल मंडलिक यांनी मार्गदर्शन केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.