रत्नागिरी- पटकावली अभिनयाची दोन पारितोषिके
esakal September 23, 2025 02:45 AM

rat21p13.jpg-
92996
तन्वी सावंत
-----------
तन्वी सावंत हीने पटकावली
अभिनयाची दोन पारितोषिके
रत्नागिरी, ता. २२ : मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीमध्ये गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या तन्वी सावंत हिने मराठी एकपात्री अभिनय स्पर्धेमध्येमध्ये रौप्य पदक आणि हिंदी एकांकिकेमध्ये उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. ती बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सची विद्यार्थिनी आहे.
मराठी अभिनय एकपात्री स्पर्धेसाठी आगळीवेगळी कथा घेतली होती. प्रत्येक पात्राच्या दोन बाजू असतात आणि हे फक्त खऱ्या नाटकप्रेमींना कळू शकतं .! गेल्या अनेक वर्षांपूर्वी रंगभूमीवर एक नाटक बंद पडलं. ‘सखाराम बाईंडर’ ज्यामधून विजय तेंडुलकर यांनी स्री-पुरुष संबंधांवर अत्यंत वास्तववादी आणि स्फोटक विषय मांडला आहे. त्यामुळे त्या काळात त्या नाटकाच्या चालू प्रयोगात लोकांनी अंडी आणि टोमॅटो फेकून मारले .! आणि या नाटकाची दुसरी बाजू प्रेक्षकांसमोर मांडली. ज्यामध्ये त्या नाटकाची समाजाला न दिसलेली बाजू मांडण्याचा प्रयत्न तन्वीने केला. ज्यामध्ये चंपा हे पात्र साकारून त्या नाटकाची दुसरी बाजू जगासमोर आणली. चंपाचे पात्र नाटकातील स्त्री-पुरुष संबंधांचे आणि सामाजिक वास्तवाचे चित्रण करते. हे नाटक घरगुती हिंसाचारासारख्या गंभीर सामाजिक विषयांना हाताळते, ज्यामध्ये चंपाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. ज्यामध्ये चंपाचा निडर स्वभाव चौकटी बाहेरील तिची विचारसरणी यावर तन्वीने काम केले आहे. ज्याचे पुनर्लेखन आणि दिग्दर्शन वेदांग सौंदलगेकर यांनी केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख आणि बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी मार्गदर्शन केले.
तन्वीचे अभिनंदन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.