Bank Rules: नवरा-बायकोला एकाच ठिकाणी नोकरीवर बंदी, राज्य सहकारी बँकेने का घेतला निर्णय?
Saam TV September 23, 2025 02:45 AM

बॅंकेत काम करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण बॅंकेत काम करण्याचे नियम आणि अटी सध्या वाढत चालल्या आहेत. राज्य सहकारी बॅंकेने पती- पत्नी या या दोघांनाही एकत्र बॅंकेत काम करण्यास मनाई केली आहे. हे धोरण राज्य सहकारी बॅंकेने लागू केले असून काही अटींचे पालन करायला सांगितले आहे. त्याबद्दल आपण पुढील बातमीत जाणून घेणार आहोत.

मुळात तुम्ही कुठेही काम करत असाल तर त्या कामासंबंधीत नियम पाळणे हे अत्यंत महत्वाचे असते. त्यातच राज्य सहकारीबॅंकेने पती व पत्नी यांना एकत्र काम न करण्याचे आदेश दिले आहेत. याचे कारण असे आहे की, पती व पत्नी एकाच संस्थेमध्ये काम करताना त्यांच्यामधील हितसंबंध, काही गुप्त माहिती तसेच गैरवर्तन टाळण्यासाठी हे धोरण लागू केले आहे. ठरलेले हे धोरण राज्य बॅंकेच्या प्रशासक सभेत मंजूर करण्यात आले आहे.

Weight Loss Tips: थुलथुलीत पोट होईल सपाट, फक्त दुपारच्या आधी ४ गोष्टी करा, दिसाल फिट

बॅंकेतील सुविधांचा लाभ

बॅंकेच्या जर तुम्ही आधीच काम करत असाल तर पती-पत्नींसाठीही बॅंकेने काही निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये पती- पत्नींपैकी ज्या कर्मचाऱ्याचे घरभाडे भत्ता जास्त असेल त्यालाच घरभाड्याचा भत्ता घेण्याचा लाभ मिळणार आहे. दोघांनाही एकाच वेळी लाभ घेता येणार नाही. मात्र जर पती-पत्नी वेगवेगळ्या शहरांमध्ये स्वतंत्र राहत असतील तर त्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास हा लाभ तुम्हाला घेता येईल. त्यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल हे एकच शहर मानले जाईल.

पती-पत्नी असल्यास राजीनामा

बॅंकेने लागू केलेल्या धोरणानुसार दोन कर्मचाऱ्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांनी सहा महिन्यांत एचआर त्याबद्दल कळवणे महत्वाचे आहे. विवाहानंतर ६० दिवसांमध्ये पती-पत्नींपैकी एकाला नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. स्वच्छेने निर्णय न घेतल्यास बॅंकच हा निर्णय घेईल.

kumbha Rashi: कुंभ राशीच्या नवरात्रीचा पहिला दिवस; प्रेम, पैसा, आरोग्य आणि नशीब काय सांगतंय?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.