पवनमावळात बैलपोळा उत्साहात
esakal September 23, 2025 06:45 AM

सोमाटणे, ता. २२ : पोळा सणानिमित्त सजविलेल्या बैलांची रविवारी (ता.२१) ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. तर, पशुधन नसणाऱ्या शेतकऱ्यांनी मातीपासून तयार केलेल्या बैल मूर्तींचे पूजन केले.
पवनमावळात बैलपोळा हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. शेतकऱ्यांना वर्षभर मदत करणाऱ्या बैलांना या दिवशी विश्रांती देण्यात आली. विविधरंगी झूल पांघरून सजवण्यात आले. पुरणपोळीचा घास भरवून सायंकाळी गावातून मिरवणुका काढण्यात आल्या. बैलांच्या शिंगातील नारळ तोडण्यासाठी गावच्या वेशीजवळ तरुणांनी गर्दी केली होती. हा मर्दानी खेळ मानला जातो. त्यामुळे तरुणांनी यात परंपरेनुसार उत्साहाने सहभाग घेतला. तर, महिला शेतकऱ्यांनी बैलांची पूजा करत कृतज्ञता व्यक्त केली.

PNE25V52072

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.