Today Gold Rate : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याने उच्चांक गाठला; ३ आठवड्यांत ७००० रुपयांची वाढ, १ तोळ्याचा भाव काय?
Saam TV September 23, 2025 01:45 PM
  • नवरात्रौत्सवाच्या शुभमुहूर्तावर जळगावात सोन्याचा दर विक्रमी ₹१.१५ लाखांवर पोहोचला.

  • तीन आठवड्यांत सोन्यात तब्बल ₹६,९०० ची वाढ झाली.

  • चांदीचे दर मात्र अद्यापही स्थिर आहेत.

  • दरवाढीमुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ.

पितृपक्षाची सांगता होऊन शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. घरोघरी घटस्थापना करण्यात आली असून, बाजारपेठ सजली आहे. विविध साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. दरम्यान, केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन वस्तू व सेवा कराचा थेट परिणाम बाजारपेठेवर लगेच जाणवलेला नाही.मात्र, सोन्याच्या दराने केलेल्या नवीन उच्चांकाने ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नवरात्रोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणे परंपरेचा भाग मानला जातो.

जळगावमध्ये शनिवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख १४ हजार ८४५ रूपयांच्या उच्चांकावर होते. सोमवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा ५१५ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख १५ हजार ३६० रूपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचले.

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; २४ अन् २२ कॅरेटचे भाव किती? वाचा सविस्तर

सुवर्ण बाजारपेठेत एक सप्टेंबरला सोन्याचे दर १ लाख आठ हजार ४५९ रूपयांपर्यंत होते. त्यानंतर कमी-अधिक फरकाने सातत्याने दरवाढ सुरूच राहिल्याने तीन आठवड्याच्या कालावधीत सोन्यात तब्बल ६९०० रूपयांची वाढ नोंदवली गेली.

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त; प्रति तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार? वाचा सविस्तर

जळगावमध्ये शनिवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो १ लाख ३६ हजार ९९० रूपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. सोमवारी घटस्थापनेच्या दिवशी सकाळी बाजार उघडताच कोणतीच वाढ अथवा घट दरात नोंदविण्यात आली नाही. त्यामुळे चांदीचे दर स्थिर राहिले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.