Vastu Tips : किचनमध्ये चुकूनही नका ठेवू या 3 वस्तू, घरात कधीच पैसा टिकणार नाही, वास्तूशास्त्र काय सांगतं?
Tv9 Marathi September 23, 2025 01:45 PM

वास्तुशास्त्रानुसार तुमचं घर जसं असतं, तसाच त्याचा प्रभाव हा तुमच्या आयुष्यावर पडत असतो. एवढंच नाही तर तुमच्या घरात कोणत्या वस्तू आहेत आणि त्या कोणत्या दिशेला ठेवलेल्या आहेत? यावर देखील तुमच्या घरातील वातावरण अवलंबून असतं, असा दावा वास्तुशास्त्रामध्ये करण्यात आला आहे. तुमचं घर कसं असावं? घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? बेडरूम कोणत्या दिशेला असावी? किचन कोणत्या दिशेला असावं? याबाबत वास्तुशास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

या सर्व गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आल्याच आहेत, मात्र घरात कोणत्या वस्तू असू नयेत? कोणत्या वस्तू असाव्यात, जर एखाद्या वस्तुची ठेवण्याची जागा चुकली तर काय होऊ शकतं? याबाबत देखील वास्तुशास्त्रामध्ये माहिती देण्यात आली आहे, वास्तुशास्त्रानुसार सामान्यपणे आपल्या घरात दोन प्रकारच्या गोष्टी असतात एक ज्यामुळे घरात सतत सकारात्मक ऊर्जा राहाते, तर दुसऱ्या गोष्टी ज्या घरात नकारात्मक गोष्टी वाढवण्याचं काम करतात.  याबाबत देखील वास्तुशास्त्रामध्ये माहिती देण्यात आली आहे.

वास्तुशास्त्रानुसार तुमचं किचन हे तुमच्या घरातील सर्वात महत्त्वाचं स्थान असतं, घरातील स्वयंपाक घर हे कुटुंबातील व्यक्तीचं ऊर्जा केंद्र असतं, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. तसेच अशा तीन गोष्टी वास्तुशास्त्रात सांगितल्या आहेत, ज्या स्वयंपाक घरात असून नये असं वास्तुशास्त्र सांगतं त्या नेमक्या कोणत्या आहेत? जाणून घेऊयात.

रात्रीची खरकटी भांडी –  वास्तुशास्त्रानुसार रात्रीची खरकटी भांडी सकाळसाठी तशीच ठेवू नयेत, ती लगेच स्वच्छ करावीत, अशी भांडी ठेवल्यामुळे लक्ष्मी अप्रसन्न होते, घरात आर्थिक समस्या निर्माण होतात.

तुटलेलेली, तडा गेलेली भांडी – वास्तुशास्त्रानुसार घरात अशी तुटलेली किंवा तडा गेलेली भांडी ठेवणं अशुभ मानलं जातं, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

मळून ठेवलेली कणिक – वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कधीच तयार कणिक ठेवू नये, जेव्हा तुम्हाला स्वयपांक करायचा असतो, तेव्हा नेहमी ती नव्यानं तयार करावी.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.