Dangers of Self-Medication in Ayurveda : आयुर्वेदाचे स्व-उपचार ठरू शकतात धोकादायक; डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा
esakal September 24, 2025 01:45 AM

Ayurveda Self-Medication Side Effect: बदलत्या जीवनशैलीत बहुतेक जण डॉक्टरांकडे जाण्याऐवजी स्वतःहून उपाय शोधण्याकडे झुकतात. विशेषतः आयुर्वेदीय औषधे, घरगुती उपाय आणि वनस्पतिजन्य उपचारांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो, पण 'नैसर्गिक, वनस्पतिजन्य किंवा आयुर्वेदीय उपचार नेहमीच सुरक्षित आणि दुष्परिणाममुक्त' हा समाजात खोलवर रुजलेला एक गैरसमज आहे. कोविड काळात प्रत्येक घरात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तयार केलेल्या काळ्यांचाही लोकांना दुष्परिणाम झाल्याचे वरळी पोदार रुग्णालय स्थित 'केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषद' या केंद्रातील संशोधक आणि वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. दरवर्षी २३ सप्टेंबर या दिवशी आयुर्वेददिनी आयुर्वेद, त्याचा उपयोग आणि दुष्परिणाम याबाबतीत जनजागृती केली जाते.

हळद, आलं, मेथी, कारल्याचा रस, काढा, जिरं किंवा ओवा यांसारखी औषधी द्रव्ये योग्य प्रमाणात, योग्य वेळेला आणि योग्य पद्धतीने वापरली, तर नक्कीच आरोग्यास लाभ होतो; मात्र याच औषधींचा अतिरेक, चुकीच्या आजारात उपयोग, चुकीच्या प्रमाणात सेवन किंवा दीर्घकाळ अनियंत्रित वापर यामुळे शरीरावर गंभीर दुष्परिणामही होऊ शकतात. त्वचेवर खाज, पुरळ, लालसरपणा किंवा इतर त्रास निर्माण होण्याचीही शक्यता असते. सौंदर्यप्रसाधने किंवा औषधी मलमांचा विनाकारण वापर टाळावा, कारण त्यातूनही अपाय संभवतो, असेही आयुर्वेदतज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

Facial Surgery Success Story: "सुसाईड डिसीज"वर यशस्वी शस्त्रक्रिया - ठाण्यात दोन रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

२०२५च्या आयुर्वेददिनाचे संकल्पना 'आयुर्वेदा फॉर पीपल अँड आयुर्वेदा फॉर प्लॅनेट' आहे. याचा अर्थ आयुर्वेद केवळ व्यक्तीचे आरोग्य जपणारा नाही, तर पृथ्वीच्या संतुलनाशीही निगडित आहे. स्थानिक वनस्पती, शाश्वत पद्धतीने तयार केलेलेऔषधोपचार आणि पर्यावरणपूरक जीवनशैली या सर्व आयुर्वेदाच्या मूलभूत तत्त्वांमध्ये अंतर्भूत आहेत. त्यामुळे आयुर्वेदाचा अवलंब केल्याने आपण स्वतः निरोगी राहतो आणि पृथ्वीच्या आरोग्यासही हातभार लावतो.

कोविड काळात अति आयुष काढा सेवनामुळे झालेल्या काही घटनांवरूनही हे स्पष्ट झाले आहे की, स्वउपचार घातक ठरू शकतो. जाहिरातींवर विश्वास ठेवून अंधाधुंद औषध सेवन केल्यास अपेक्षित परिणाम न मिळता शरीरावर विपरीत परिणाम होण्याचा धोका वाढतो.

- डॉ. दत्तात्रय दिघे, अनुसंधान अधिकारी (आयु)

अनेक औषध कंपन्या आयुर्वेदाच्या नावाखाली अतिशयोक्तीपूर्ण दावे करून जनतेची दिशाभूल करतात. अशा जाहिरातींवर आयुष मंत्रालय बारकाईने नजर ठेवून आहे. अजूनही त्यामध्ये जनजागृतीची आवश्यकता आहे.

डॉ. आर. गोविंद रेड्डी, प्रभारी सहाय्यक निदेशक (आयु)

Side Effects of Overuse of Antibiotics: प्रतिजैविक औषधांचा अंदाधुंद वापर धोकादायक तज्ज्ञ डॉक्टरांच्या परिषदेत विस्तृत चर्चा संशयित तक्रारींची नोंद

२०१८ पासून आतापर्यंत आयुष सुरक्षा पोर्टलवर १०६ संशयित रुग्णांची प्रकरणे नोंदली गेली असून, ३,०७९ दिशाभूल करणाऱ्या आयुष संदर्भातील जाहिरातींची नोंद करण्यात आली आहे. आयुर्वेद, होमिओपॅथी व अॅलोपॅथीच्या औषधांचा एकत्रित वापर करणारे रुग्ण अनेकदा दुष्परिणामांच्या तक्रारींसह आढळतात. प्रत्येक औषधाची मात्रा, वेळ व आजाराच्या प्रकृतीनुसार वापर बदलतो. म्हणूनच स्वतहून औषध घेण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.