आशिया कप स्पर्धेतून श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पाकिस्तान श्रीलंका यांच्यात सुपर 4 फेरीतील महत्त्वाचा सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम गोलंदाजी करताना 20 षटचकात 8 गडी गमवून 133 धावा केल्या. तसेच विजयासाठी 134 धावांचं आव्हान दिलं. पाकिस्तानने हे आव्हान 18 व्या षटकात पाच गडी गमवून पूर्ण केलं. हे आव्हान गाठताना पाकिस्तानने चांगली सुरुवात केली. पण झटपट चार विकेट गेल्यानंतर बॅकफूटला आले होते. मात्र त्यानंतर मधल्या फळीच्या फलंदाजांनी डाव सावरला आणि विजय मिळवला. या विजयामुळे पाकिस्तानच्या अंतिम फेरीच्या आशा अजूनही कायम आहेत. पाकिस्तानला आता बांगलादेशच्या खेळीकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. भारताने बांगलादेशला पराभूत केल्यास पाकिस्तानला अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळेल. भारताने बांगलादेशला हरवले तर श्रीलंका स्पर्धेतून बाद होईल. तर भारताचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल.
कामिंदू मेंडिसच्या 50 धावा वगळता श्रीलंकेच्या कोणत्याही फलंदाजाने योग्य कामगिरी करता आली नाही. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी झुंज दिली पण त्यांच्याकडे पुरेसे धावा नव्हत्या. दुसरीकडे पाकिस्तानकडूनहुसेन तलतने नाबाद 32 आणि मोहम्मद नवाजने नाबाद 38 धावांची खेळी केली. हुसेन तलत आणि मोहम्मद नवाज यांच्यातील नाबाद 58 धावांची भागीदारी ही पुरुषांच्या टी20 आशिया कप स्पर्धेतील विक्रमी भागीदारी ठरली. धावांचा पाठलाग करताना सहाव्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी आहे. स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानसाठी सहाव्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी आहे.
सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर हुसेन तलत म्हणाला की, ‘परिस्थिती सोपी नव्हती. मी माझा वेळ घेतला. आक्रमक क्रिकेट खेळायचे असले तरी परिस्थिती तुम्हाला पूर्ण ताकदीने खेळण्याची परवानगी देत नाही. कर्णधार आणि प्रशिक्षक माझ्याशी बोलले. योजना होती की जा आणि हल्ला करा. पण मी माझ्या अंतर्मनाच्या भावनांना पाठिंबा दिला. मला थोडा वेळ घ्यायचा होता आणि नंतर वाटले की सीमा येतील. खूप आर्द्रता होती. माझी ऊर्जा कमी होती. शेवटी, आम्ही ठरवले की नवाज मोठे फटके मारेल. मी माझ्या गोलंदाजी प्रशिक्षकासोबत माझ्या गोलंदाजीवर खूप काम करत होतो. मला माझ्या योजनेला पाठिंबा द्यावा लागला. जर मी दोन चांगले षटके टाकली तर मला माहित होते की माझ्या संघाला फायदा होईल.’