आपल्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर प्रेक्षकांची आवडती आहे. अमृताने 'चंद्रमुखी' चित्रपटातून प्रेक्षकांना वेड लावलं. या चित्रपटामुळे तिच्या करिअरला चार चांद लागले. तिने मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतदेखील आपली छाप पाडली. ती फिटनेसच्या बाबतीतदेखील अतिशय सजग आहे. ती सोशल मीडियावरदेखील प्रचंड सक्रीय असते. मात्र अमृताला ८ वर्षांपूर्वींओ पीसीओडीचं निदान झालं होतं. तेव्हापासून ती स्वतःची कशी काळजी घेते याबद्दल तिने तिच्या युट्युब चॅनेलवर सांगितलं आहे.
अमृताचं स्वतःचं एक युट्यूब चॅनेल आहे. त्यावर ती वैयक्तिक आयुष्यातील निरनिराळे व्हिडिओ शेअर करत असते. अशाच एका व्हिडिओमध्ये ती म्हणाली, 'उपवास करायचा की नाही याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. त्यामुळेच मी हा आजचा व्हिडीओ तुम्हा सर्वांबरोबर शेअर करतेय. फास्टिंग केल्यामुळे आपल्या शरीराला कसा फायदा होतो, माझी दिनचर्या नेमकी कशी असते आणि फास्टिंगमुळे मला कसा फायदा झाला. याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. जवळपास ८ ते १० वर्षांपूर्वी मला PCOD झाल्याचं समजलं. त्यानंतर मला संपूर्ण जीवनशैली बदलावी लागली. या सगळ्यात प्रामुख्याने जेवणाच्या वेळेत बदल करावा लागला. त्यानंतर मी योगा करू लागले आणि हळुहळू मला फास्टिंग आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे याची जाणीव झाली.'
View this post on InstagramA post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)
ती पुढे म्हणाली, 'रात्रीचं जेवण ते सकाळचा नाश्ता…यामध्ये तुम्ही किती अंतर ठेवता हे फार महत्त्वाचं असतं. मला माझ्या आहारतज्ञांनी सांगितलं होतं की, रात्रीचं जेवण काहीही करून तुला ७ ते ७:३० पर्यंत जेवायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी तुला ७ वाजल्यानंतरच खायचं आहे. यादरम्यान, मी पाणी, ग्रीन टीचं सेवन करते. सुरुवातीला संध्याकाळी ७ ते सकाळी ७ असे १२ तास मी काहीच खायचे नाही…ती वेळ आता वाढलीये…मी आता जवळपास १६ तास तरी काहीच खात नाही. माझ्या रात्रीच्या जेवणाची वेळ आता फारच लवकर असते.'
अमृता वेळ सांगत म्हणाली, 'मी साधारण ६ ते ६:३० वाजता जेवून मोकळी होते. त्यानंतर ब्लॅक कॉफी पिते किंवा चिया सीड्स विथ लेमन वॉटर पिते. मध्ये १६ तासांचा वेळ गेल्यावर सकाळी मी व्यवस्थित नाश्ता करते…तुम्ही त्याला जेवणही बोलू शकता. फास्टिंगचे विविध प्रकार आहेत १२ तास, १४ तास, १६ तास किंवा महिन्यातून एकदा मी पूर्ण २४ तास उपवास करते. मला वैयक्तिक आयुष्यात याचा खूप जास्त फायदा झालाय. मी आयुष्यात प्रचंड शांत झालेय, वजन नियंत्रित राहिलं, फास्टिंग काळात मी सर्वात जास्त पाणी पिऊ लागले, यामुळे पचनसंस्थेला पूर्ण आराम मिळतो, सतत मनात जेवणाचा विचार येत नाही. असे सगळे अनेक बदल माझ्या आयुष्यात झाले. तुम्ही सुद्धा अशाप्रकारचं फास्टिंग करू शकता. फक्त सुरुवात १२ तासांच्या फास्टिंगपासून करा.'
जुई गडकरीचं नवीन पाऊल; ठरलं तर मग' मधून घेणार ब्रेक? सुरू केलं नवं काम, फोटो शेअर करत म्हणाली- लवकरच...यासोबतच ती म्हणाली, 'रात्री ७-८ पर्यंत जेवलात…की १२ तासांनंतर सकाळी व्यवस्थित नाश्ता करायचा. या १२ तासांच्या वेळेत आवळा शॉट, तूप-पाणी ( १ ग्लास पाण्यात एक चमचा तूप ), ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, निंबू पाणी ( साखरेशिवाय ) या पेयांचं सेवन तुम्ही करू शकता. मला या दिनचर्येचा प्रचंड फायदा झाला.'
अरे हा तर 'होणार सून मी...' मधला डायलॉग... तेजश्रीच्या जुन्या मालिकेतलं वाक्य प्रेक्षकांनी ओळखलं, 'वीण दोघातली तुटेना'चा प्रोमो चर्चेत