जगूनही तीळ-तीळ मेल्यासारखे वाटते... पती गेल्यानंतर पत्नीने शेती कसली, पण निसर्गाचा कोप झाला... डोळ्यात पाणी आणणारी व्यथा!
esakal September 24, 2025 05:45 AM

राज्यात हातात आलेलं पिक पाण्यात बुडालं. शेतकऱ्यांसमोर दोन घास जेवणाचा प्रश्न उभा राहिला. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे भयानक परिस्थिती आहे. सरकार पंचनामे करेल, ठीक आहे, पण त्याची मदतही काही वेळा मिळत नाही. मात्र शेतकरी कर्ज घेऊन, उसनवारी करून शेती करतो. पण निसर्गाचा कोप होतो.. अशावेळी त्याला साथ पाहिजे शासनाची, पण ती दिसत नाही. हा इतिहास आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेतकऱ्यांची परिस्थिती जैसे थे आहे... आता पिकं काढणीला आली असताना पावसाने हाहाकार माजवला. मातीतून उगवलेले सोयाबीन पुन्हा मातीत गेलं... पण याचा हिशोब कोण देणार? निसर्गाच्या विरोधात तर कोर्टात जाता येणार नाही. पर्याय आहे शासनाच्या मदतीचा...

विविध पिकांचे प्रचंड नुकसान

अनेक शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे चारा, कापूस, सोयाबीन, मका, भाजीपाला यासह विविध पिकांचे प्रचंड नुकसान झालं. पाण्या निचरा न झाल्याने पीकं अक्षरक्षा कुजली. “लाखो रुपये खर्च करून उभारलेले पीक पूर्ण वाया गेलं. तोंडाचा घास हिरावून घेतल्यासारखी स्थिती महाराष्ट्रात आहे...

अचानक आलेल्या या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला. आधीच पिकांवर कीड, रोगराई आणि बाजारभावातील चढ-उतारामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने आणखी मोठा फटका बसला. अनेक शेतांमध्ये काही दिवस पाणी साचून राहिल्यास पिकांची पूर्णपणे कुजण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक उदाहरण तर डोळ्यातून पाणी आणतं. सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील शिवाजी कोल्हे यांचं काही वर्षांपूर्वी निधन झाले. मात्र त्यांच्या पत्नीने हिमंत हारली नाहीत. एक मुलगा आणि एक मुलगी असा संसार... पत्नी रामकलाबाई शिवाजी कोल्हे यांच्यावर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी पडली. अडीच एकर जमिनीवर त्यांनी शेती करण्याचे ठरवले.

मराठवाड्यात आठवडाभरापासून पावसाचा कहर

सगळी कामे करून त्यांनी शेती केली. मागच्या हंगामात महावितरणच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या शेतात आग लागली. पिकं जळाली, साहित्य जळाले. पंचनामा झाला, मात्र मदत मिळाली नाही. आजवर शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ त्यांना मिळालेला नाही, नुकसानभरपाईसुद्धा नाही. त्यांनी हार मानली नाही आणि यंदाच्या खरीप हंगामात स्वतःच्या हाताने रान तयार केलं. पाठीवर पंप घेऊन स्वतःच फवारणी केली. आता अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेतच वाहून गेलं. सुपीक जमीन खरडून दगड उघडे पडले. राहायला घर नाही, जे आहे तेही मातीत गेले. तरीही आज ना उद्या काहीतरी चांगले होईल, या आशेवर ते दिवस काढत होते.

Rain Update: पावसाचा हाहाकार! ९० जण मंदिरात अडकले, महसूल कर्मचाऱ्यांचाही समावेश! दीर्घकालीन उपाय आणि चांगली अंमलबजावणी गरजेची

मात्र या अस्मानी संकटामुळे त्यांना जगूनही तीळ-तीळ मेल्यासारखे वाटते, असं त्या म्हणाल्या. मराठवाड्यात आठवडाभरापासून पावसाने कहर केलंय. या अतिवृष्टीमुळे रामकलाबाई शिवाजी कोल्हे यांच्या शेतीतील पीक वाहून गेले. पिकांसह शेतजमीनही खरडून वाहून गेली. आता मदतीसाठी त्या आर्त हाक मारत आहेत. कोणीतरी आधार देईल अशी त्यांना आशा आहे. ही फक्त एका शेतकऱ्याची परिस्थिती आहे. आता तुम्ही विचार करा, कृषीप्रधान देशातील महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांची काय परिस्थिती असेल?

सरकारच्या मदतीमुळे शेतकऱ्यांना काही आधार मिळू शकतो, जसं की आर्थिक मदत किंवा पिकांच्या नुकसानभरपाईसाठी विमा... याचा परिणाम सरकार किती प्रभावीपणे आणि त्वरित मदत पोहोचवतं, यावर अवलंबून आहे. थोडक्यात, दुष्काळ जाहीर केल्याने काही प्रमाणात मदत मिळू शकते, पण परिस्थिती पूर्णपणे बदलण्यासाठी दीर्घकालीन उपाय आणि चांगली अंमलबजावणी गरजेची आहे.

Cabinet Decision : शेतकऱ्यांसाठी 1339 कोटी मंजूर... कोणत्या जिल्ह्यात किती मिळाली मदत, वाचा एका क्लिकवर...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.