Ajit Pawar: निवडणुकीपूर्वी अजितदादांना मोठा धक्का! ८ वर्षांपासून निष्ठावान नेत्याचा राजीनामा, चिंतन शिबिराने वाढवली चिंता?
esakal September 24, 2025 07:45 AM

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चिंतन शिबिर नागपूरात पार पडले. यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. अजित पवारांनी आपल्या गटातील नेत्यांचे कानही टोचले. या बैठकीत कार्यकर्ते-नेत्यांचे गट करून चर्चा करण्यात आली. पक्ष वाढीसाठी अजित पवार गटाचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला नागपूरातून रणशिंग फुंकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चिंतन करण्याची खरी गरज असल्याची चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादीत नाराजीचे नाट्य

चिंतन शिबिरानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीत नाराजीचे नाट्य पाहायला मिळत आहे. अनेक निष्ठावंत नाराज आहेत. गेल्या ८ वर्षांपासून नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पद भूषवणारे बाबा गुजर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी वैयक्तिक कारणे दिली असली, तरी याला राजकीय किनार असल्याची चर्चा आहे.

आठ वर्षांपासून बाबा गुजर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष

गेल्या आठ वर्षांपासून बाबा गुजर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते. दोन्ही गट वेगळे झाल्यानंतर बाबा गुजर दादांसोबत आले होते. काही दिवसांपूर्वीच शहराध्यक्ष प्रशांत पवार यांच्या जागी अनिल अहिरकर यांची नागपूर शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. त्यामुळे आता नागपूर ग्रामीणमध्येही बदल होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Ajit Pawar: वेळ देत नसाल तर खुर्ची सोडा; अजित पवार :‘राष्ट्रवादी’च्या मंत्र्यांची कानउघाडणी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

नागपूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा बाबा गुजर यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पाठवला आहे. बाबा गुजर म्हणाले, "८ वर्षे पदावर राहिलो आहे. प्रकृती खराब असल्याने दुसऱ्यांना संधी देण्यासाठी राजीनामा देत आहे. प्रदेश पातळीवर संधी दिल्यास काम करेन. पक्ष वाढवताना कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे," असे अजित पवारांनी चिंतन शिबिरात सांगितले आहे.

बाबा गुजर काय म्हणाले?

"राष्ट्रवादीला पुढे नेण्यासाठी काही नवीन लोक उत्सुक दिसत असल्याने हा निर्णय घेतला आहे," असेही बाबा गुजर म्हणाले. त्यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेली ८ वर्षे जिल्हाध्यक्ष पदावर त्यांनी काम केले असून त्यांना मोठा अनुभव आहे.

अजित पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर बाबा गुजर यांनी त्यांना समर्थन दिले होते. त्यामुळे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुजर यांची हकालपट्टी केली होती. मात्र अजित पवारांनी "आपण लढणाऱ्यांसोबत आहोत" असे सांगत बाबा गुजर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली होती.

Ajit Pawar: धनंजय मुंडे म्हणतात, हाताला काम द्या; अजित पवारांसह जरांगेंनी दिलं उत्तर
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.