डिजिटल युगाचा रायगडमध्ये आरंभ
‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’चे जिल्हाधिकाऱ्यांकडून लोकार्पण
अलिबाग, ता. २३ (वार्ताहर) ः शासकीय सेवा सुलभ, पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या सुविधा देण्यात आली आहे. या नवीन डिजिटल सेवेचे लोकार्पण जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आले.
शासकीय कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध शासकीय सेवा, योजना, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, आवश्यक मार्गदर्शन याबाबत अधिकृत, जलद आणि तपशीलवार माहितीसाठी चॅटबॉटची सुविधा दिली गेली आहे. यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार धाव घेण्याची गरज भासणार नाही, तर मोबाईलवरच आवश्यक माहिती सहज उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे प्रशासनासोबतचा संवाद अधिक परिणामकारक होणार असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.