National YogaAsana Competition: 'राष्ट्रीय योगासन स्पर्धेत सीमा पवार यांनी रौप्यपदक पटकावले रौप्य'; राज्य चॅम्पियनशिपमध्येही चमकदार कामगिरी
esakal September 24, 2025 07:45 AM

जामखेड: सहाव्या राष्ट्रीय योगासन चॅम्पियनशिपमध्ये तालुक्यातील मूळच्या बावी गावच्या व सध्या पुणे येथे स्थायिक असलेल्या सीमा सुधीर पवार यांनी दमदार खेळ करत सीनियर ए (२८ ते ३५ वयोगट) गटामध्ये रौप्यपदक पटकावले आहे.

Mpsc Success Story: 'सख्खे बहीण-भाऊ राज्य विक्रीकर निरीक्षक'; कुठऱ्याच्या मोनिका व हर्षवर्धन पाटीलचे यश, एमपीएससीद्वारे यशाला गवसणी

सीमा पवार यांनी सुरवातीला पुणे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान झालेल्या महाराष्ट्र राज्य योगासन चॅम्पियनशिपमध्ये सीमा चमकल्या आणि सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड निश्चित केली. या स्पर्धेत केवळ सुवर्णपदक विजेत्यांना राष्ट्रीयमध्ये संधी मिळाली होती.

छत्तीसगडच्या भिलाई-दुर्ग येथे ११ ते १४ झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील ३० राज्यांतील आघाडीचे योगपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या सेमीफायनलमधून टॉप १० खेळाडू फायनलमध्ये पोहोचले. फायनलमध्ये सीमाने ५० पैकी ४२.३३ गुण मिळवत रौप्यपदक पटकावले. स्पर्धेचे आयोजन भारत सरकारच्या युवक कल्याण आणि खेळ मंत्रालय विभागामार्फत योगासन भारत (इंडियन योगा असोसिएशन) या संस्थेमार्फत करण्यात आले होते.

Mpsc Success Story: 'एमपीएससी परीक्षेत अमृता ननवरे मुलींमध्ये राज्यात प्रथम'; जिद्द अन् चिकाटीच्या जाेरावर यशाला गवसणी मान्यवरांच्या हस्ते गौरव

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई, छत्तीसगड विधानसभेचे अध्यक्ष रमण सिंग, योगसन भारतचे अध्यक्ष उदित सेठ, योगसन भारतचे संयुक्त सचिव जयदीप आर्या, महाराष्ट्र योगा असोसिएशनचे अध्यक्ष संजय मालपाणी यांच्या उपस्थितीत सीमा पवार यांना गौरवण्यात आले. सीमा यांच्या यशामागे गुरू चंद्रकांत पांगारे यांचे मार्गदर्शन लाभले. सीमा यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.