Gold Rate Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होते आहे. आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे सोनं १ लाख १४ हजारांवर पोहोचलं आहे. आज सोन्याच्या दरात १००० ते १२ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सराफा बाजारातही शांतता दिसून येत आहे. आज पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढल्याने सोनं खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद कमी होताना दिसतो आहे.
२४ कॅरेट सोन्याचे दर आज १२६० रुपयांनी वाढले आहेत. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ११५० रुपयांनी वाढले आहे. याशिवाय १८ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. १८ कॅरेट सोनं ९४० रुपयांनी महागलं आहे. त्यानुसार २४ कॅरेट सोनं १,१४, ३३० रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोनं १, ०४,८०० रुपये प्रति १० ग्रॅम, तर १८ कॅरेट सोनं ८५ हजार ७५० रुपये प्रती १० ग्रॅमवर पोहोचले आहे.
Gold Jewelry: सोन्याचे दागिने हे केवळ शोभेचे साधन नसून, सांस्कृतिक वारसा अन्..आज दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचे दर ११४४८, तर २२ कॅरेट सोन्याचे दर १०४९५, तर १८ कॅरेट सोन्याचे दर ८५९० इतके आहेत. तसेच मुंबईत २४ कॅरेट सोन्याचे दर ११४३३, २२ कॅरेट सोन्याचे दर १०४८० इतके आहेत, याशिवाय १८ कॅरेट सोन्याचे दर ८७०० इतके आहेत
Gold Price Today: 10 ग्रॅम सोने 5,800 रुपयांनी महागले; काय आहे आजचा भाव?याशिवाय, नागपूरमध्ये २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर अनुक्रमे ११२५८, १०३२३ आणि ८४४४ रुपये प्रति ग्रॅम इतके आहेत.