Rain Flood: मराठवाड्यामध्ये पावसाने हाहाःकार केला आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने प्रशासानाने मदतकार्यासाठी लष्काराला पाचारण केलेलं आहे. लोक मृत पावले आहेत, शेकडो जनावरं दगावली आहेत आणि घरं उद्ध्वस्त झाली आहे. राज्य सरकारने मदतीचा जीआर काढला असला तरी प्रत्यक्षात पदरात कधी आणि किती पडेल, हे सांगणं अवघड आहे.
मराठवाड्याचे विभागीय आयुक्त डॉ. जितेंद्र पापळकर यांनी 'साम टीव्ही'शी बोलताना एकंदरीत परिस्थिती विषद केली. आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात नांदुरा, हवेली, पिंपळगाव कानडा येथे २८ लोक अद्याप अडकलेले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील वाघेगाव १५० लोक अडकलेले आहेत. त्यांना रेस्क्यू करणं सुरु आहे, त्यासाठी आर्मीला पाचारण करण्यात आलेलं आहे.
मराठवाड्यात मागच्या चोवीस तासांमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४४ जनावरे दगावली आहेत. याशिवाय ३२५ घरे पडली असून 22 लाख हेक्टर नुकसान झालेले आहे. राज्य सरकारने पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागात मदतीसाठी शासन निर्णय काढला आहे. ही मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या पदरात पडावी, अशी माफक अपेक्षा व्यक्त होत आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मदतीसंदर्भात करण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे.
यानुसार २२१५ कोटींची मदत देण्यासाठी जीआर काढले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्यातील ३० जिल्ह्यांसाठी ही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे
जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांचेनुकसान
शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये १३३९,४९,२५,०००/- (रूपये एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार फक्त) इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.