IND vs WI : रिषभ पंत, करूण नायर OUT, देवदत्त पडिक्कलला संधी! West Indies विरुद्ध असा असेल भारताचा कसोटी संघ
esakal September 24, 2025 01:45 AM
  • इंग्लंड दौऱ्यात झालेल्या दुखापतीतून रिषभ पंत पूर्णपणे सावरलेला नसल्याने त्याची निवड होण्याची शक्यता कमी आहे.

  • करून नायरला दुसरी संधी मिळूनही तो प्रभाव दाखवू शकला नाही आणि त्यामुळे त्याला संघाबाहेर जावे लागणार आहे.

  • देवदत्त पडिक्कलने भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ सामन्यात १५० धावांची खेळी करून निवडकर्त्यांचे लक्ष वेधले आहे.

Why Rishabh Pant is out of India vs West Indies Test squad: वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. शुभमन गिल आशिया चषक स्पर्धेत खेळतोय आणि ही स्पर्धा २८ स्पटेंबरला संपणार आहे. त्यानंतर लगेच चार दिवसांनी IND vs WI कसोटी मालिका सुरू होतेय, त्यामुळे गिलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. त्यात रिषभ पंत इंग्लंडमध्ये झालेल्या दुखापतीतून अजूनही सावरलेला नाही. त्यामुळे त्याच्या खेळण्यावरही संभ्रम आहेच. सात वर्षांनी भारताच्या कसोटी संघात स्थान मिळूनही फार कमाल दाखवू न शकलेला करूण नायर मात्र संघाबाहेर जातोय, हे निश्चित झालंय.

विंडीज मालिकेसाठी संघ निवडण्यासाठी निवड समितीची बुधवारी बैठक होणार आहे आणि या बैठकीत बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया हेही ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. नायरला इंग्लंड दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसरी संधी मिळाली होती, परंतु प्रभाव पाडण्यात तो अपयशी ठऱला. चार कसोटीत त्याला २५ च्या सरासरीने २०५ धावा करता आल्या. नायरने देशांतर्गत क्रकिटेमध्ये २१ शतकं व २९ अर्धशतकांसह ७००० हून अधिक धावा केल्या आहेत. पण, त्याला भारताकडून कसोटी पुनरागमनात अपयश आले.

Shreyas Iyer : श्रेयसने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली; वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी घेतला मोठा निर्णय, भारताच्या संघात जागा नाही

नायरच्या जाण्याने देवदत्त पडिक्कलला मधल्या फळीत संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे. ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने पहिल्या सामन्यात १५० धावांची खेळी केली होती. मागील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारताच्या संघाचा तो सदस्य होता आणि तो नायरच्या जागी पुनरामन करण्यास सज्ज आहे. श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या पहिल्या सामन्यात ८ धावा करता आल्या होत्या आणि दुसऱ्या सामन्यातून त्याने माघार घेऊन कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी गमावली.

रिषभ पंतही वेस्ट इंडिज मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे. इंग्लंड दौऱ्यावर रिषभच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती आणि त्याला सावरण्यासाठी ६ आठवडे लागतील असे सांगण्यात आले होते. तो नुकताच बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला होता, परंतु त्याच्या तंदुरुस्तीत अपेक्षित सुधारणा दिसत नसल्याचे वृत्त आहे. शुभमन गिल आशिया चषक स्पर्धा संपवून कसोटी मालिकेत नेतृत्व करणार आहे. त्याच्यासोबत यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन व केएल राहुल अशी फलंदाजांची फौज आहे. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातली पहिली कसोटी २ ते ६ ऑक्टोबरला अहमदाबाद, तर दुसरी कसोटी १० ते १४ ऑक्टोबरला नवी दिल्ली येथे होणार आहे.

Aryan Sharma: 'विराट, २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियासाठी खेळताना मला पाहा', जेव्हा ११ व्या वर्षी बोललेला शब्द त्याने खरा करून दाखवला

भारताचा संभाव्य संघ - शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, नितीश रेड्डी व एन जगदीशन

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.