नाशिकच्या हाय प्रोफाईल सोसायटीत वेश्याव्यवसाय
पोलिसांनी ३ महिला अन् एका पुरूषाला रंगेहाथ पकडलं
परिसरात खळबळ
नाशिकच्या येवल्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. उच्चभ्रू वस्तीतील वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला आहे. वस्तीमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकून तीन महिला तसेच एका पुरूषाला ताब्यात घेतलं आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलं असून, पुढील तपास सुरू आहे.
येवल्यातील अंगणगाव येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये वेश्याव्यवसाय सुरू होता. याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळाली. स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी थेट अवैध व्यवसायावर छापा टाकला. पोलिसांनी तीन महिला आणि एका पुरूषाला आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडलं.
गर्भवती बायकोला भेटायला सासरी जात होता, दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; रस्त्यावर सोडले प्राणया प्रकरणी पोलिसांनी ३ महिला आणि एका पुरूषाला ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणानंतर उच्चभ्रू वस्तीमध्ये खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. याआधी देखील येवला शहरातील बस स्टँड समोरील एका हॉटेलमध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतलं होतं.
सरपंचाचे फिल्मी स्टाईल अपहरण; हात बांधले, ८०० किलोमीटर दूर नेत गोठ्यात डांबून ठेवलं, नेमकं काय घडलं?मुंबई आणि नाशिकमधील हल्ल्याच्या निषेधार्थ नवी मुंबईतील पत्रकार एकवटले
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ, नवी मुंबईतील पत्रकार एकवटले आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. त्र्यंबकेश्वर येथे काही गुंडांनी तीन ते चार इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना बेदम मारहाण केली होती. ज्यात अनेक पत्रकार गंभीर जखमी झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे.
मुंबई, पुणे आणि नाशिक यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पत्रकारांवर हल्ले वाढत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, नवी मुंबईतील पत्रकारांनी सरकारला तातडीने पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.