पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. नैऋत्य बलुचिस्तान प्रांतातील मास्तुंग जिल्ह्यातील दश्त भागात जाफर एक्सप्रेसमध्ये शक्तिशाली स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे जाफर एक्सप्रेस रुळावरून घसरली असून अनेक डबे उलटले आहेत. या अपघातात तीन डब्ब्यांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून लोक जीव वाचवण्यासाठी धावपळ करत असल्याचे समोर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार दश्त परिसरातून ट्रेन जात असताना हा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे अनेक डब्यांचे नुकसान झाले असून काही डबे रुळावरून घसरले आहेत. या घटनेमुळे ट्रेनमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी धावपळ केल्याचेही समोर आले आहे. सध्या प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे आणि जखमींना मदत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी पोहोचली. स्थानिक लोक आणि बचाव पथक ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना डब्यांमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत काही लोक जखमी झाले आहेत. या जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या घटनेत काही जीवितहाणी झाली की नाही याबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र अद्याप कोणत्याही गटाने या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट होण्याची ही पहिलीच घटना नाही. 10 ऑगस्ट रोजी बलुचिस्तान प्रांतातील मास्तुंग जिल्ह्यात रुळांवर लावलेल्या स्फोटकांमुळे जाफर एक्सप्रेसचे सहा डबे रुळावरून घसरले होते. या घटनेत चार जण जखमी झाले. त्यावेळी ट्रेन पेशावरकडे जात होती. क्वेटापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या स्पाझंद रेल्वे स्थानकाजवळ सकाळी 9 वाजता ही घटना घडली होती. घटनेवेळी ट्रेनमध्ये 350 प्रवासी होते अशी माहितीही समोर आली होती. त्यानंतर आता जाफर एक्सप्रेसला पुन्हा एकदा निशाणा बनवण्यात आले आहे.