“70 लाख एकरवर जमिनीवरची पिकं उद्धवस्त झाली आहेत. शेतकऱ्याच घर, पशुधन नष्ट झालेलं आहे. साधारण 36 लाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे. आता 36 लाख शेतकऱ्यांची पिकं, पशुधन, घरदार, गावच्या गावं वाहून गेलेली आहेत. 9 लाख कोटीच कर्ज असलेल्या या सरकारने 2215 कोटी रुपये कागदावर मंजूर केलेले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडून 10 हजार कोटींची मागणी केली. ती मिळाल्याशिवाय मराठवाडा पुन्हा उभा राहणार नाही” असं संजय राऊत म्हणाले.” मराठवाड्याच्या पूरग्रस्तांना तात्काळ 10 हजार कोटींची मदत मिळावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आता आपला सही, शिक्का, चिन्हाच्या पिशव्यांमधून मदत वाटण्याच काम सुरु आहे. हा किती निर्लज्जपणा आहे. लोक मरतायत आणि तुम्ही भगव्या पिशव्या त्यावर तुमचे फोटो, पक्षाचं चिन्ह हे प्रचार करण्याचं कोणतं तंत्र या लोकांनी अवलंबल आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“भाजपचा वेगळा कारभार, मिंधे गट, मग अजित पवार येतील इथे सुद्धा स्पर्धा चाललीय का? लोक मरतायत, आक्रोश चालला आहे. लोक वाहून जातायत अशा प्रकरे निदर्यपणे काम करणारं सरकार आहे. प्रत्येक ठिकाणी राजकारणात पैशाची मस्ती आहे, एवढी पैशाची मस्ती असेल, तर स्वतच्या घराच्या तिजोऱ्या रिकाम्या करा. नगरविकास खात्याने ठेकदाराकडून लुटलेला पैसा,शक्तीपीठ महामार्ग, समृद्धी महामार्गात लुटलेला पैसा मराठवाड्याच्या शेतकऱ्यासाठी मोकळा करा.अबालवृद्ध तरुण, महिलांना मदत करा. ही सरकारची जबाबदारी आहे” अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. उद्या उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर चालले आहेत.
9 ते 10 लाख कोटीच कर्ज आहे, ते सरकार मदत कुठून करणार?
“सरकारने कोणत्याही प्रकारचं नियोजन केलेलं नाही. याआधी दुष्काळ आला, अवकाळी पाऊस आला त्या संदर्भात आश्वासन दिली पण का पूर्ण झाली नाहीत?. या सरकारवर 9 ते 10 लाख कोटीच कर्ज आहे. ते सरकार शेतकऱ्यांना कुठून मदत करणार?. म्हणून उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना आवाहन केलय की, 10 हजार कोटींची तात्काळ मदत करा. ओला दुष्काळ शब्द सोडून द्या, हा आघात साधा नाही. फक्त पिकं वाहून गेलेली नाहीत, शेत जमीन, माती वाहून गेली आहे. ज्या मातीत पिक घेतली जातत, ती मातीच वाहून गेलीय. पुढच्या अनेक पिढ्याचं नुकसान झालं आहे. मराठवाड्यातील शेतकरी शेतीच्या दृष्टीने उद्वस्त झाला आहे, हे या सरकारच्या लक्षात आलय का?. जे आपल्या दाढीचे फोटो पिशव्यांवर छापून मदत वाटतायत किंवा प्रचार करतायत त्यांना किती मोठं नुकसान झालय हे कळलय का?. ही मतं मागण्याची, प्रचार करण्याची वेळ नाहीय, हे भाजप आणि मिंधे गटाला समजलं पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले.