Cricketer Died: संघाला जिंकवलं, मात्र जीव गमावला! शेवटचा चेंडू टाकल्यानंतर गोलंदाज अचानक मैदानात कोसळला अन्...
esakal October 14, 2025 07:45 AM
  • उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील क्रिकेट सामन्यात वरिष्ठ गोलंदाज अहमर खानने संघाला विजय मिळवून दिल्यानंतर जीव गमावला.

  • त्याने शेवटचा चेंडू टाकल्यानंतर तो अचानक मैदानात कोसळला होता.

  • या घटनेने क्रिकेट जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Bowler Dies After Last Ball: खेळांच्या मैदानात खेळाडूंनी जीव गमावल्याच्या घटना गेल्या काही वर्षात सातत्याने घडताना दिसत आहेत. यातील अनेक खेळाडूंनी हृदयविकाराच्या झटक्याने जीव गमावला आहे. आता नुकतीच भारतात अशी धक्कादायक घटना घडली आहे.

उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जिल्ह्यातही ही घटना असून रविवारी एक वरिष्ठ गोलंदाज त्याच्या संघाला जिंकवून दिल्यानंतर अचानक मैदानावर कोसळला आणि त्याने काही क्षणात जीव गमावला. या खेळाडूचे नाव अहमर खान असे आहे.

Cricketer Died during Match: धक्कादायक! सिक्स मारल्यानंतर क्रिकेटर अचानक कोसळला अन् काही क्षणातच जीव गमावला; Video

मिडिया रिपोर्ट्सनुसार नुकतीच उत्तर प्रदेश वेटरन्स क्रिकेट असोसिएशनने एक सामना अयोजित केला होता, ज्यात मुरादाबाद आणि संभालमधून संघ सहभागी झाले होते. रविवारी झालेल्या सामन्यात मुरादाबादने पहिल्यांदा फलंदाजी करताला संभालसाठी लक्ष्य दिले होते.

संभालला शेवटच्या ४ चेंडूत १४ धावांची गरज होती. पण डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या अहमरने मुरादाबाकडून गोलंदाजी करताना शानदार गोलंदाजी केली आणि संघाला ११ धावांनी विजय मिळवून दिल होता.

दरम्यान, शेवटचा चेंडू त्याने टाकल्यानंतर अहमर अचानक मैदानात कोसळला आणि त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत त्याने जीव गमावला होता. ही घटने या सामन्याचे शूट करणाऱ्या व्यक्तीच्या फोनच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार तेथील प्रत्यक्षदर्शीने सांगितले की अहमरला श्वास घेताना त्रास होत असल्याचे दिसले, ज्यानंतर तो खेळपट्टीवर खाली बसला आणि काही क्षणात अचानक खाली कोसळला.

त्यामुळे आजूबाजूचे खेळाडू त्याच्याजवळ धावले. तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्याला सीपीआरही दिला. त्याने त्यावर प्रतिसादही दिला, ज्यानंतर त्याला लगेचच जवळच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिकेतून हलवण्यात आले.

Cricketer died during Match: सिक्स मारताना आला हार्ट अटॅक, जालन्यात ३२ वर्षीय खेळाडूचा मृत्यू; मनाला चटका लावणारा Video

मात्र हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच त्याचे प्राण गमावले असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यामुळे सध्या क्रिकेट विश्वास हळहळ व्यक्त होत आहे. मुरादाबादमधील क्रिकेट वर्तुळात अहमर हा प्रसिद्ध चेहरा होता. तो तिथे गेली अनेक वर्षे क्रिकेट खेळत होता. तो खेळत असलेल्या स्पर्धेच्या आयोजकांकडून या घटनेबाबत शोक व्यक्त करण्यात आला आहे.

तथापि, अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. यापूर्वीही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. अगदी काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एका ३२ वर्षीय तरुणाने षटकार मारल्यानंतर अचानक मैदानात कोसळल्यानंतर काही क्षणात जीव गमावला होता. तसेच जून २०२५ मध्ये पंजाबमध्येही अगदी अशीच घटना घडली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.