दिवाळी काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे मुंबईतील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची वर्दळ दिसत आहे. मुंबईकर मोठ्या उत्साहात या सणाची तयारी करताना दिसत आहेत. दुकानदारसुद्धा विविध वस्तूंवर दिवाळीनिमित्त खास सवलत देत असल्याने ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह वाढलेला दिसत आहे. दिवाळी म्हटले की, नवीन कपडे, दागिने, घरसजावटीच्या वस्तू खरेदी केल्या जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मुंबईतील अशा बाजारपेठा सांगणार आहोत, जेथे उत्तम दर्जाच्या आणि कमी किंमतीत वस्तू खरेदी करतात येतात.
भुलेश्वर मार्केट –
भुलेश्वर मार्केटमध्ये कमी किंमतीत उत्तम दर्जाच्या वस्तू मिळतात. येथे तुम्हाला साड्यांची, भांड्याची, गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करता येईल. अगदी 2 रुपयांपासून पणती येथे मिळेल. तर साड्या, घागरे, लहान मुलांचे कपडे स्वस्त दरात मिळतील. त्यामुळे खरेदीसाठी वेळ कमी असेल आणि उत्तम दर्जाच्या वस्तू खरेदी करायच्या असतील भूलेश्वर हा उत्तम पर्याय आहे.
हेही वाचा – Winter Travel : ऑक्टोबरमध्ये एक्सप्लोर करा ही ठिकाणे
कंदिलागल्ली, माहीम –
दिवाळी म्हटले की, कंदील खरेदी करण्यात येतो. तुम्हाला कमी दरात कंदील खरेदी करायचा असेल तर माहिमच्या कंदीलगल्ली नक्की जा. येथे आकाराने लहान-मोठे, रंगीबेरंगी, कागदाचे, कापडाचे असे विविध स्वरुपाचे कंदील खरेदी करता येतील. विशेष म्हणजे हे कंदील हातांनी बनवलेले असतात.
कुंभारवाडा, धारावी –
दिवाळी दिव्यांचा सण आहे. त्यामुळे दिवे, पणत्या यांची खरेदी करायची असेल तर धारावीतील कुंभारवाड्यात जावे. येथे आकर्षक रंगाच्या आणि आकाराच्या पणत्या खरेदी करता येतील. मुंबईतील अनेक व्यापारी होलसेल रेट मध्ये येथून पणत्या खरेदी करतात आणि रिटेलमध्ये विकतात.
लोहार चाळ –
दिवाळीत सर्वत्र रोषणाई केली जाते. हल्ली बाजारात नवनवीन प्रकारच्या लाइट्स मिळतात, ज्यांची किंमत जास्त असते. अशा परिस्थितीत स्वसत दरात लाइट्स खरेदी करायच्या असतील तर मुंबईतील काळबादेवी येथे लोहार चाळ येथे जा. येथे कमी पैशांत तर वस्तू मिळतीलच शिवाय त्याच्या दर्जाही उत्तम असेल.
हेही वाचा – Gold : तुम्ही खरेदी केलेले सोने खरे की खोटे? ओळखण्याचे सोपे मार्ग