Pune Accident: गुलटेकडी उड्डाणपुलावर भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
esakal October 14, 2025 07:45 AM

पुणे : गुलटेकडीतील उड्डाणपुलावर भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, स्वारगेट पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नरसिंगमल उत्तमचंद तातेड (वय ७६, रा. शांतिनगर सोसायटी, कोंढवा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी तातेड यांचा मुलगा जितेंद्रकुमार तातेड यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

नरसिंगमल तातेड हे शनिवारी (ता. ११) दुपारी तीनच्या सुमारास दुचाकीवरून गुलटेकडीतील उड्डाणपुलावरून जात होते.

Nanded Accident: पूर्णा नांदेड रोडवर दुचाकींच्या समोरासमोर धडकेत एक ठार, दुसरा तरुण गंभीर जखमी

त्यावेळी भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात तातेड गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक निकिता पवार तपास करीत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.