rat12p14.jpg-
98088
चिपळूण ः विद्यार्थ्याना सोलार लॅम्पचे वाटप करताना कंपनीचे अधिकारी.
पाचशे विद्यार्थ्यांना सोलार स्टडी लॅम्प
डेल टेक्नॉलॉजीजचा पुढाकार ; वीज नसली तरीही अभ्यास थांबणार नाही
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः विजेअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, गावातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत मिळावी, या हेतूने डेल टेक्नॉलॉजीज, ग्रीन इंडिया इंजिनिअरिंग आणि द सोलार मॅन ऑफ इंडिया यांच्यावतीने ९ शाळांना सौर ऊर्जेवर चालणारे अभ्यास करण्यासाठी वापरले जाणारे ५०० दिवे (सोलार स्टडी लॅम्प) मोफत देण्यात आले. याचे वाटप आबीटगाव येथे करण्यात आले.
कोकणातील वीज समस्येच्या पार्श्वभूमीवर या सोलार स्डटी लॅम्पचे मोफत वाटप केले आहे. या उपक्रमात आबिटगाव, कळबंट, तोंडली, पालवण येथील ९ जिल्हा परिषद शाळांमधील ५०० विद्यार्थ्यांना सोलारचे दिवे देण्यात आले. आबीटगाव जिल्हा परिषद शाळेत या वाटपाचे आयोजन केले होते. ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी नियमीत विजपुरवठा होत नाही. परिणामी विद्यार्थ्याना अभ्यास करताना अडचणी येतात. या सोलार लॅम्पमधून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक असलेला प्रकाश मिळणार आहे. शैक्षणिक कार्यात अडथळा येणार नाही. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची गुणवत्ता व सुरक्षिततेशी निगडीत समस्या देखील काही प्रमाणात कमी होईल, असे ग्रामस्थांनी नमूद केले.
हा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. अशा प्रकारचे उपक्रम इतर गावांमध्ये देखील राबवले जावेत, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला डॉ. सचिन यशवंत शिंगवण, ग्रीन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुयोग गंगावणे, प्रोजेक्ट डायरेक्टर मोहित वैद्य, अनुप राजमाने उपस्थित होते.