लोकप्रिय मराठी नृत्य दिग्दर्शिका दीपाली विचारे यांनी आजवर अनेक सुपरहिट गाणी दिग्दर्शित केली आहेत. 'एकापेक्षा एक' या रिऍलिटी शोमध्ये आपली खरीखुरी मतं मांडून घराघरात ओळख निर्माण करणाऱ्या दीपाली विचारे यांनी अनेक हिट चित्रपटांसाठी काम केलं आहे. त्यांनी ९० हून अधिक चित्रपटांसाठी आणि असंख्य टीव्ही शो आणि कार्यक्रमांसाठी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. नुकतीच त्यांनी इट्स मज्जाला मुलाखत दिली. यात बोलताना त्यांनी बॉक्स ऑफिसवर गाजलेला 'चंद्रमुखी' या चित्रपटातील गाणी आशिष पाटील नव्हे तर आपण दिग्दर्शित केल्याचं सांगितलं आहे.
'चंद्रमुखी' हा चित्रपट चांगलाच गाजला. अभिनेत्री अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला. मात्र यात सगळ्यात जास्त गाजलं ते 'चंद्रा' हे गाणं. या गाण्यातील हटके स्टेप्स आणि अमृताचे हावभाव याचं खूप कौतुक झालं. हे गाणं अमृता आणि नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील यांच्या रिलमुळे लोकांपर्यंत पोहोचलं. मात्र या गाण्याचं दिग्दर्शन त्याने केलेलं नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दीपाली यांनी याबद्दल सांगितलं आहे.
View this post on InstagramA post shared by Deepali Vichare (@deepalivichare)
दीपाली म्हणाल्या, 'चंद्रा'चं गाणं हे अजय अतुलने केलेलं. मी काहीही केलं असतं तरीही ते गाणं लोकांपर्यंत पोहोचलं असतं. त्या गाण्याला खूप मेहनत केली आणि त्या गाण्याचं रील शूट केलं अमृताने आशिषला घेऊन. आशिष आणि अमृताने त्याची रील केली आणि ती खूप व्हायरल झाली. त्यातली मुख्य स्टेप तीच ठेवली. मी जे गाणं केलं होतं ते त्या भूमिकेचं गाणं होतं. कारण चंद्रमुखी जशी नाचेल तशी ती नाचलीये. कारण त्यांनी जो केला तो ट्रेण्ड. लोकांना पटकन कॅच करता येतील अशा स्टेप्स केल्या. फक्त साइन सेम ठेवली. त्यामुळे ते गाणं खूप पोहोचलं. पण त्यामुळे लोकांचा असा गैरसमज पण झाला की ते गाणं आशिषने केलंय.'
पुढे दीपाली म्हणाल्या, 'पण आशिष माझा मुलगा आहे. माझ्याकडे खूप काम केलंय त्याने. त्या रीलमुळे ते खूप फेमस झालं. पण त्याच्या युट्यूब व्हिडिओला ३०० मिलियनपेक्षा जास्त व्हीव्हयू आहेत. म्हणजे आपण चांगलं काम केलंय. फक्त रिलमुळे ते गाणं चाललं की नाही माहीत नाही पण त्यामुळे ते गाणं पोहोचलं. पण फिल्मचं गाणं एवढ्या लोकांनी बघितलं म्हणजे ते गाणं जरा बरं असेल असं मला वाटतं. मी त्यातली दोन गाणी केली. 'सवाल जवाब' आणि 'चंद्रा' त्यातलं माझं आवडतं 'सवाल जवाब' आहे.'
कोकणचा कोहिनुर अखेर हास्यजत्रेत परतला! ओंकार भोजने पुन्हा खळखळून हसवणार, केली शूटिंगला सुरुवात