Nashik Crime: गुन्हेगारी रॅपरची जिरवली; टक्कल करत काढली धिंड, कोयत्याची भाषा करणाऱ्याला चालताही येईना|Video Viral
Saam TV October 15, 2025 04:45 AM
  • सोशल मीडियावर गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्या रॅपरवर कारवाई.

  • पोलिसांनी रॅपरचं टक्कल करून त्याची धिंड काढली.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर पोलीस अॅक्शन मोड आले आहेत.

अभिजीत सोनवणे, साम प्रतिनिधी

सोशल मीडियावर गुन्हेगारी रिल बनवून गु्न्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्यावरही नाशिक पोलिसांची कारवाई सुरू आहे. सोशल मीडियावर ताईगिरी करणाऱ्या दोन तरुणींना खाक्या दाखवल्यानंतर आज पोलिसांनी गुन्हेगारी रॅप करणाऱ्याची जिरवली. आपल्या रॅपमधून गुन्हेगारांचा कौतुक करणाऱ्याला नाशिक पोलिसांनी कायदाचा इंगा दाखवला. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी केला गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक शहरातील गुन्हेगारांनानायनाट करण्यासाठी पोलीस अॅक्शन मोडवर आली आहे. प्रत्येक दिवसाला गुन्हेगारांना अटक सत्र सुरू आहे. चौकाचौकात भाईगिरी,दादागिरी, दहशत माजवणारे कोयता गँग वाल्याचा हिशोब पोलीस जागच्या जागीच करत आहेत. शहरात गुन्हेगारी वाढल्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फ्री हॅण्ड दिल्यानंतर पोलिसांकडून गुन्हेगारांची धरपकड सुरू आहे. अटक होण्याच्या धाकाने अनेक गुन्हेगारांनी शहर सोडलंय. नाशिक पोलीस गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्याला धडा शिकवत आहेत.

Crime News : बापानेच लेकीचं कुंकू पुसलं, लग्नाच्या ३ महिन्यातच जावयाची केली हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका तरुणाने गुन्हेगारीवरील रॅप सॉन्ग रिल अपलोड केले होते. त्यानंतर पोलिसांनीया रॅपरवर कारवाई करत त्याचे टकक्ल करत बाजारातून धिंड काढली. कोयत्यानं खोपडी फोडण्याची भाषा करणाऱ्या रिल रॅपरला पोलिसांनी खाकीचा दम दाखवल्यानंतर रॅप सोडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचं म्हणू लागला. पोलिसांनी त्याची धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात गुन्हेगारी रॅप बनवणाऱ्याला साधं चालताही येत नव्हतं.

Nashik Cyber Crime : डिजिटल अरेस्टची भीती; ज्येष्ठ नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा युवकावर प्राणघातक हल्ला

नाशिकच्या पंचवटीतील गजानन चौकातील कोमटी गल्लीत भरदिवसा दुचाकीहून आलेल्या संशयिताने एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. काही नागरिकांनी हल्लेखोराला हटकल्याने सुदैवाने हा युवक बचावला. काही नागरिकांनी मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रीकरण केलं. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र संशयित फरार झाल्याने सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलमध्ये चित्रित झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून दोघा हल्लेखोरांचा शोध सुरू केलाय.

सोमवारी दुपारी एक युवक पळत गजानन चौकातील कोमटी गल्लीत आला. त्याचा पाठलाग करत दोघे संशयित दुचाकीहून आले, त्यांनी अक्षरशः या मार्गाहून जाणाऱ्या दोन मुली आणि स्कूल व्हॅनला धडक दिली आणि त्या पळणाऱ्या युवकाला रस्त्यातच गाठून दुचाकीहून उतरलेल्या एका संशयिताने धारदार शस्त्राने युवकाचा पोटावर वार केला. आणि त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.