वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या मागच्या तीन पर्वात तीन वेगवेगळे विजेते पाहायला मिळाले आहेत. पहिल्या पर्वात न्यूझीलंडने, दुसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलियाने आणि तिसऱ्या पर्वात दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवला आहे. आता चौथ्या पर्वात अंतिम फेरीत कोण जागा मिळवणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. या पर्वात पाकिस्तानने दमदार सुरुवात केली आहे. गतविजेत्या दक्षिण अफ्रिकेला पहिल्याच सामन्यात पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. पाकिस्तानने थेट पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. तर भारतीय संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे. असं असताना भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम फेरीची लढत होऊ शकते असं चित्र आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत भारताचे 11 सामने शिल्लक आहेत. यात दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 2, श्रीलंकेविरुद्ध 2, न्यूझीलंडविरुद्ध 2 आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध 5 सामन्यांची मालिका होणार आहे. यात न्यूझीलंड आणि श्रीलंका दौरा त्यांच्या भूमीत असेल. त्यामुळे भारतासाठी या दोन मालिका कठीण असतील. 14 नोव्हेंबरपासून दक्षिण अफ्रिकेविरुद्ध, त्याने ऑगस्ट 2026 मध्ये टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाईल. त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर 2026 मध्ये न्यूझीलंड दौरा करेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळतील. ही मालिका जानेवारी-फेब्रुवारी2027 मध्ये होणार आहे.
भारत आपल्याच भूमीत एकूण 7 सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेसाठी हा कठीण पेपर असेल. त्यामुळे टीम इंडियाला अंतिम फेरीची संधी आहे.पाकिस्तानचंही असंच काहीसं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 पर्वात पाकिस्तान 12 कसोटी खेळेल. यात पाच कसोटी सामने मायभूमीत, तर 7 कसोटी सामने विदेशात खेळणार आहे. दक्षिण अफ्रिकेनंतर पाकिस्तानचा संघ श्रीलंकेशी सामना करेल. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची मालिका घरच्या मैदानावरच होईल. त्यानंतर मार्च 2026 मध्ये बांग्लादेश दौऱ्यात दोन सामने खेळेल. जुलै 2026 मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाईल. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाईल.
पाकिस्तानला बांग्लादेश आणि वेस्ट इंडिजचा दौरा सोप असेल. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्याची मोठी संधी असेल. असं झालं तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत भारत पाकिस्तान सामना होऊ शकतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर आहेत. तर तिसऱ्या स्थानी श्रीलंका, तर चौथ्या स्थानी भारत आहे. इंग्लंडची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे.