चाकण, ता.१५ : भोसे (ता. खेड) गावच्या हद्दीत चाकण-शिक्रापूर मार्गाजवळ मंगळवारी (ता. १४) एका घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा, कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम दोन लाख ३० हजार रुपये असा सुमारे १२ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल भर दिवसा सकाळी सव्वाअकरा ते दुपारी पावणेदोनच्या सुमारास चोरून नेला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दिलीप लोणारी यांनी फिर्याद दिली आहे, अशी माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके यांनी दिली.