वडापुरी, ता. १६ : वडापुरी (ता. इंदापूर) परिसरात अचानक झालेल्या पावसामुळे रस्त्यावर वाळवण्यासाठी टाकलेली मका गोळा करताना शेतकऱ्यांची धांदल उडाली.
गेल्या १५ दिवसांपासून पावसाने विश्रांती दिल्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मका काढणीसाठी सुरुवात केली, तर काही शेतकऱ्यांनी मका काढून मशिनद्वारे केली असून, ती वाळवण्यासाठी रस्त्यावर टाकली होती. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे ही मका गोळा करताना शेतकऱ्यांची धांदल उडाली असल्याचे वडापुरी परिसरात पहावयास मिळाले.
वडापुरी परिसरात अचानक होत असलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे मजुरांचा तुटवडा व दुसरीकडे पावसाचा तडाखा यामुळे मका उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
02790