Box Office Collection: 'कांतारा'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना; तर 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' निघावला फुसका बार
Saam TV October 18, 2025 10:45 PM

Box Office Collection Report: चित्रपटगृहांमध्ये सध्या दक्षिण भारतीय चित्रपटांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. ऋषभ शेट्टीच्या "कांतारा चॅप्टर १" ने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे, तर "सनी संस्कारींची तुलसी कुमारी" आणि "जॉली एलएलबी ३" सारखे प्रमुख बॉलीवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकत नसल्याचे दिसत आहे.

कांतारा चॅप्टर १

ऋषभ शेट्टीने "कांतारा चॅप्टर १" द्वारे केवळ दिग्दर्शक म्हणूनच नव्हे तर अभिनेता म्हणूनही स्वतःला सिद्ध केले आहे. चित्रपटाच्या लोककथांवर आधारित कथानक, आश्चर्यकारक छायांकन आणि उत्तम पार्श्वसंगीतामुळे हा चित्रपट एक कल्ट अनुभव बनला आहे. चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी ६१.८५ कोटींची विक्रमी कमाई करून सर्वांना आश्चर्यचकित केले. दोन आठवड्यांत, त्याने ४८५ कोटींचा टप्पा ओलांडला. शुक्रवारी ९.१२ कोटी कमाई केली, यामुळे एकूण कलेक्शन ४९४.३८ कोटी झाले. या आकडेवारीवरून हे सिद्ध होते की हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.

Rise And Fall Winner: अर्जुन बिजलानी ठरला 'राईज अँड फॉल'चा विजेता; ट्रॉफीसह मिळले इतक्या रुपयांचं बक्षीस

'सनी संस्कार की तुलसी कुमारी'

वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या जोडीची प्रेक्षकांना उत्सुकता असली तरी, हा चित्रपट अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. हलक्याफुलक्या कौटुंबिक मनोरंजनाचा चित्रपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'सनी संस्कार की तुलसी कुमारी'ची सुरुवात चांगली झाली, परंतु दुसऱ्या आठवड्यात त्याची गती मंदावली. शुक्रवारी फक्त ८९ लाख कमाई करणाऱ्या या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ५५.९९ कोटी झाले आहे. सान्या मल्होत्रा आणि रोहित शराफ सारख्या कलाकारांच्या उपस्थिती असूनही, हा चित्रपट प्रेक्षकांना खास आवडला नाही.

Rise And Fall Winner: अर्जुन बिजलानी ठरला 'राईज अँड फॉल'चा विजेता; ट्रॉफीसह मिळले इतक्या रुपयांचं बक्षीस

जॉली एलएलबी ३

अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या "जॉली एलएलबी ३" या कोर्टरूम कॉमेडीने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. तरी, बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकला नाही. शुक्रवारी २६ लाखांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ११४.४६ कोटींवर पोहोचले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.