पुणे : एका व्यक्तीने भटक्या श्वानासोबत अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मॉडेल कॉलनीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मॉडेल कॉलनीतील प्राणीमित्र व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका ५५ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांचा ग्रुप असून, ते या भागातील भटक्या प्राण्यांची देखभाल करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका श्वानाला जेवण देऊन त्याच्यावर औषधोपचार केले होते.
Pune News: Nilesh Ghaiwal, Bandu Andekar, Gajanan Marne सह टोळ्यांना पोलीस आयुक्तांचा इशारा | Sakal Newsपरंतु तो श्वान काही दिवसांपासून दिसत नसल्याने त्यांनी परिसरात काहीजणांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीने व्हिडिओ पाठविला. त्यात एकजण त्या श्वानासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचे दिसून आले.
याबाबत त्यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही विकृत मनोवृत्ती असून, हा प्रकार समजल्यानंतर आम्हालाही मोठा धक्का बसला, असे पोलिसांनी सांगितले.