उ.सोलापूर: नान्नज जिल्हा परिषद गट आरक्षित झाल्यामुळे माजी अध्यक्ष बळिराम साठे यांची अडचण झाली आहे. कार्यकर्ते मात्र साठे यांना बीबी दारफळ गटातून उभे राहण्याचा आग्रह करत आहेत. याबाबत आपण सारासार विचार केल्यानंतरच निर्णय घेऊ, अशी घोषणा बळिराम साठे यांनी केले आहे. शुक्रवारी शासकीय विश्रामगृहावर साठे गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी ही मागणी केली.
Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्थ आक्रमक'; खटला जलदगती न्यायालयात चालवाराष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळिराम साठे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद, माजी उपसभापती जितेंद्र शीलवंत, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख नागेश पवार, श्रीकांत मार्तंडे, स्वप्नील कदम, दीपक अंधारे आदी उपस्थित होते.
या बैठकीत कार्यकर्त्यांनी बळिराम साठे यांनी बीबीदारफळ जिल्हा परिषद गटातून आपली उमेदवारी जाहीर करावी असा आग्रह धरला. यावेळी साठे म्हणाले, अद्याप आपण उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेतला नसून सर्व कार्यकर्त्यांशी बोलून याबाबत निर्णय घेऊ. त्याचबरोबर कुठल्याही पक्षाबरोबर युती न करता स्थानिक समविचारी लोकांशी आघाडीबाबत चर्चा करावी, असेही यावेळी साठे म्हणाले.
MPSC Success Story:'लिंबच्या सुनबाईची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी';'एमपीएससी'त साधली हॅट्रिक, वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात! आमदार देशमुख यांचीही घेतली भेटबळिराम साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा त्याग केल्यापासून तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साठे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. शुक्रवारी साठे यांनी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांची लोकमंगल बँकेच्या मुख्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये येणाऱ्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. देशमुख यांनी साठे यांना मदतीचे आश्वासन दिले आहे का? याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही.