वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियानंतर आणखी संघ उपांत्य फेरीत, भारताचं समीकरण एका सामन्यावर
GH News October 19, 2025 02:11 AM

वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेतील 19वा सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात झाला. हा सामना झाला असं म्हणता येणार नाही. कारण पावसामुळे हा सामना ड्रॉ झाला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. अशा निकालामुळे एका संघाला थेट फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियानंतर आणखी एका संघाची उपांत्य फेरीत वर्णी लागली आहे. दक्षिण अफ्रिकेला उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात बांगलादेशकडून दक्षिण अफ्रिकेला पराभवाची धूळ चाखावी लागली होती. मात्र त्यानंतर दक्षिण अफ्रिकेने जोरदार कमबॅक केलं आणि सलग 4 सामन्यात विजय मिळवला. यात दक्षिण अफ्रिकेने भारताचा पराभवही केला. आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका हे दोन संघ उपांत्य फेरीसाठी फिक्स झाले आहे. आता उर्वरित दोन जागांसाठी चुरस असणार आहे.

उपांत्य फेरीच्या उर्वरित दोन जागांसाठी सहा संघ शर्यतीत आहेत. कारण अजून तरी कोणताच एक अपात्र ठरलेला नाही. त्यामुळे पुढच्या प्रत्येक सामन्यात उपांत्य फेरीचं गणित वेगाने बदलणार आहे. तसंच पाहिलं तर न्यूझीलंड, बांग्लादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ काठावर आहे. या संघांना एक पराभव आणि स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. पण उर्वरित दोन जागांसाठी इंग्लंड, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चुरस असणार आहे. त्यातही न्यूझीलंडचं गणित जर तर वर असणार आहे. टीम इंडियाला न्यूझीलंडच्या तुलनेत चांगली संधी आहे. पण सर्व गणित आता एका सामन्यावर असणार आहे.

भारताचे या स्पर्धेत तीन सामने शिल्लक आहे. इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेशशी सामना होणार आहे. 19 ऑक्टोबरला होणारा भारत इंग्लंड हा सामना त्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा असणार आहे. इंग्लंडने हा सामना जिंकला तर थेट उपांत्य फेरीत जागा मिळेल. पण भारताचं गणित खूपच कठीण होईल. पण हा सामना भारताने जिंकला तर चुरस आणखी वाढणार आहे. भारत न्यूझीलंड सामन्याचं महत्त्वही वाढेल. त्यामुळे येत्या दोन ते तीन सामन्यात उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे उर्वरित दोन संघ कोणते याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.