मुंबई : मुंबईत दिवाळीची जोरदार तयारी सुरू असून, नागरिकांनी शुक्रवारी (ता. १७) बाजारांत खरेदीसाठी गर्दी केली होती; मात्र रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाल्याने नागरिक हैराण झाले. पश्चिम द्रुतगती मार्गापासून दादर टीटी सर्कलपर्यंत वाहनांच्या काही किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. त्यात नागरिक तासन्तास अडकून पडले. चालक आणि प्रवाशांनी यावर संताप व्यक्त केला.
एका प्रवाशाने सांगितले की, वांद्रे ते विलेपार्ले या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. हा त्रास कधी संपणार? वाहतूक पोलिसांचे गैरव्यवस्थापन दिसले. टिळक पुलावर पोलिस नव्हते. त्यामुळे दादर टीटी सर्कल पूर्ण जाम झाले होते. कुर्ला पश्चिमेकडील परिसर गुगल मॅपवर रेड झोन दाखवण्यात आला होता. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, पठाणवाडी सिग्नल आणि मुंबई-नाशिक महामार्गावरही अशाच प्रकारची वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. येथे काही जण तासाभराहून अधिक काळ अडकले होते.
पठाणवाडीजवळ रुग्णवाहिका तासाभराहून अधिक काळ हॉर्न वाजवत होती; परंतु त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. कोणताही वाहतूक पोलिस दिसला नाही, असे एका प्रवाशाने सांगितले. मुंबईसाठी वाहतूक कोंडी काही नवीन नाही; परंतु उत्सवाच्या हंगामात ही समस्या वाढली आहे. प्रवासी वाहतूक विभागाला अधिक कर्मचारी तैनात करण्याची आणि सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्याची विनंती करीत आहेत.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीदिवाळी सणांची सुट्टी तसेच विकेंडमुळेअनेकजण मित्रपरिवारासोबत बाहेरगावी निघाले आहेत. यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आहे. विशेषतः खंडाळा घाट आणि लोणावळा टोल क्षेत्राजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले.